बीडचं पालकमंत्रिपद गमावताच धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, अजित पवारांचं नाव घेत म्हणाले...

Guardian Ministers Announced : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कुणाला मिळतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Guardian Ministers Announced : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कुणाला मिळतं याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. बीडच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली पाच वर्ष धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. त्यांना हे पालकमंत्रिपद गमावावं लागलं आहे.

बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय. या प्रकरणात मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. तसंच मुंडेंवरही विरोधकांनी आरोप केले आहेत. त्यांना पालकमंत्रिपद देऊ नये ही विरोधकांची आग्रही मागणी होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद गमावताच धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. सोशल मीडिया नेटवर एक्सवर (पूर्वीचे नाव ट्विटर) पोस्ट करत धनंजय मुंडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बीडचे पालकमंत्री स्वीकारावं अशी विनंती आपण केली होती, असं मुंडे यांनी या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.

( नक्की वाचा : मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश? )
 

धनंजय मुंडे यांची पोस्ट

'बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना. अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे.

बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.

Advertisement

सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील.'