जाहिरात

मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश?

Guardian Ministers Announced : गेल्या अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर जाहीर केली.

मुंडेंना धक्का, तटकरेंना बळ... पालकमंत्र्यांच्या यादीतून मुख्यमंत्र्यांनी काय दिले महत्त्वाचे संदेश?
मुंबई:

Guardian Ministers Announced : गेल्या अनेक दिवसांपसून प्रतिक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर जाहीर केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्ष महायुतीमध्ये आणि मंत्रिमंडळात आहेत. या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाचं वाटप करत असताना मुख्यमंत्र्यांनी समतोल साधण्याबरोबरच काही महत्त्वाचे संदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धनंजय मुंडेंना धक्का

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. भाजपा आमदार सुरेश धस त्यासाठी विशेष आग्रही होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मागणी मान्य केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडंच बीडचं पालकमंत्रिपद कायम राहिले असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री असतील. 

बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून आता अजित पवारांना आता नवं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलंय.

गडचिरोली मुख्यमंत्र्यांकडेच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले आहे. नक्षलवादाचा प्रभाव असलेला जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती. राज्यातील सर्वात अविकसित जिल्हा म्हणूनही गडचिरोलीचं नाव घेतलं जात असे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ही ओळख बदलण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. 

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री असतान गडचिरोलीचं पालकमंत्रिपद हे त्यांच्याकडेच होते. त्यानंतर मागील पाच वर्ष एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी हे पालकमंत्रिपद स्वत:कडे घेतलं आहे. 2025 ची सुरुवात गडचिरोलीतून करत फडणवीस यांनी त्याचे संकेत दिले होते. आजच्या यादीतून त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

( नक्की वाचा : Guardian minister: पालकमंत्रिपदाची घोषणा! कोणत्या मंत्र्यांच्या पदरात कोणता जिल्हा? पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर )
 

तटकरेंना धक्का

बीडप्रमाणेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपदासाठी देखील महायुतीमध्ये स्पर्धा होती. शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात या पदासाठी स्पर्धा होती. त्यामध्ये तटकरे यांनी बाजी मारलीय. तर भरत गोगावले यांना मात्र कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालेलं नाही.

मुश्रीफांना कोल्हापूर नाही

रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्षात राष्ट्रवादीनं बाजी मारली. पण, कोल्हापूरमध्ये या दोघांच्या संघर्षात शिवसेनेची सरशी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मिळालेलं नाही. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकरांकडं हा चार्ज देण्यात आलाय. त्याचबरोबर भाजपाच्या माधुरी मिसाळ यांना सह-पालकमंत्री करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हा भाजपाच्या  भाजपाच्या टार्गेटवर असणार हे स्पष्ट झालं आहे. 

पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी 

गडचिरोली          देवेंद्र फडणवीस 
ठाणे                   एकनाथ शिंदे 
मुंबई शहर           एकनाथ शिंदे 
पुणे                     अजित पवार 
बीड                    अजित पवार 
नागपूर                 चंद्रशेखर बावनकुळे 
अमरावती             चंद्रशेखर बावनकुळे 
अहिल्यानगर          राधाकृष्ण विखे पाटील 
वाशिम                  हसन मुश्रीफ 
सांगली                  चंद्रकांत  पाटील
नाशिक                 गिरीश महाजन 
पालघर                  गणेश नाईक 
जळगाव                 गुलाबराव पाटील 
यवतमाळ               संजय राठोड 
मुंबई उपनगर         आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा 
रत्नागिरी                 उदय सामंत 
धुळे                       जयकुमार रावल 
जालना                   पंकजा मुंडे 
नांदेड                     अतूल सावे 
चंद्रपूर                    अशोक उईके 
सातारा          शंभूराज देसाई
रायगड         आदिती तटकरे
लातूर          शिवेंद्रसिंहराजे भोसले
नंदूरबार        माणिकराव कोकाटे
सोलापूर        जयकुमार गोरे
हिंगोली        नरहरी झिरवाळ
भंडारा        संजय सावकारे
छत्रपती संभाजीनगर  संजय शिरसाट
धाराशिव       प्रताप सरनाईक
बुलडाणा       मकरंद जाधव (पाटील)
सिंधुदुर्ग       नितेश राणे
अकोला      आकाश फुंडकर
गोंदिया      बाबासाहेब पाटील 
कोल्हापूर     प्रकाश आबिटकर
कोल्हापूर    माधुरी मिसाळ (सह-पालकमंत्री)
गडचिरोली   आशिष जयस्वाल (सह -पालकमंत्री)
वर्धा        पंकज भोयर
परभणी     मेघना बोर्डीकर
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com