पक्ष निरीक्षकांसमोरच काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, शहर अध्यक्षालाच फटकवले

या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा ही झाला. या राड्यामध्ये हिंगोली शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण करण्यात आली. प्रकरण अगदी पोलीस ठाण्यापर्यंत गेलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
हिंगोली:

समाधान कांबळे 

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळाली यासाठी पक्षात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात हिच स्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशमुळे काँग्रेस नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. हिंगोली जिल्ह्यातही उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेसचं वर्चस्व राहिले आहे. राजीव सातव यांनी या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.सध्या जिल्ह्यात सातव गट आणि माजी आमदार भाऊसाहेब पाटील गोरेगावकर यांचा गट कार्यरत आहे. विधानसभा निवडणुकी निमित्ताने पक्षाचे निरिक्षक हिंगोलीत आले होते. त्यावेळी निरीक्षकां समोरच या दोन गटात जोरदार राडा झाला. यात हिंगोली शहर अध्यक्षांनाच मारहाण झाली. त्यामुळे हिंगोलीतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

  हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजीव सातव गट आणि भाऊराव पाटील गोरेगावकर गट पहिल्यापासून कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर तर सातव आणि पाटील यांच्यातली दरी आणखी वाढत गेली. राजीव सातव यांच्या मृत्यूनंतरही ही दरी आजही कायम आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सातव गट आणि भाऊ पाटील गोरेगावकर गट यामध्ये अंतर्गत वाद सुरूच असतात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ पाटील गोरेगावकर हे यावर्षी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. तर सातव गटाकडून सुरेश अप्पा सराफ आणि प्रकाश थोरात हे दोघे इच्छुक आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपणार? ऑगस्ट-सप्टेबरचे पैसे 'या' दिवशी खात्यात जमा होणार

मात्र या तीन उमेदवारां शिवाय वकील असलेले सचिन नाईक यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान 22 सप्टेबर रोजी संध्याकाळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माजी आमदार कुणाल चौधरी हे हिंगोलीत आले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. खरं पाहायला गेलं तर या दोन्ही गटांचं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोमिलन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याची चर्चा आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'द लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंचा ट्वीट करत इशारा 

या मेळाव्यासा सुरूवात झाली. त्यावेळी सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. त्याच वेळी भाऊ पाटील गट आणि सातव गट हे आमने-सामने आले. या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली.  त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा ही झाला. या राड्यामध्ये हिंगोली शहर अध्यक्ष पवन उपाध्याय यांना मारहाण करण्यात आली. प्रकरण अगदी पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. त्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचे पुन्हा एकदा समोर आल्याचे पाहायला मिळालं. त्यात आता हिंगोली विधानसभेचे तिकीट कोणाला मिळतं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

Advertisement