समाधान कांबळे, प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा गणपती करुन समुद्रात उचलून टाकू असा इशारा दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले कडू?
'शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर मी एकटा सर्वांना घाम पडतो तर महाराष्ट्रातून पंधरा-वीस आमदार विधानसभेत गेले तर मुख्यमंत्र्यांना समुद्रात उचलून टाकू,' असं वक्तव्य बच्चू कडू यांनी या भाषणात केलं.
बच्चू कडू याावेळी म्हणाले की, 'एसटीमध्ये ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला 12 हजार रुपये महिना मिळतात. तर कलेक्टरच्या कारचा ड्रायव्हर असलेल्या माणसाला 45 हजार रुपये महिना मिळतो. तू एका माणसाला घेऊन जातो तुला 45 हजार मिळतात. आमचा एसटी ड्रायव्हर 50 लोकांना घेऊन जातो, त्याला 12 हजार रुपये मिळतात. तुमच्या बापाचं राज्य आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे. या लोकांना उखडून फेकून टाकू.'
( नक्की वाचा : सचिन वाझेचे सनसनाटी आरोप! पत्रातील 'मोठे पवार' साहेब, 'पाटील' साहेब कोण ? )
बच्चू कडू तिसरी आघाडी करणार?
बच्चू कडू यांचा महायुतीला पाठिंबा आहे. पण, ते विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी करुन लढण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी तसे संकेत दिले होते. 'रविकांत तुपकर, आप आणि इतर पक्षांसोबतच चर्चा होत आहे. आता तरी पूर्ण चर्चा झालेली नाही. आपण एकत्र येऊन शेतकरी, मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे. आविधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करु. मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ,' असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.
शेतकरी, मजुरांबाबत काँग्रेसनं ते केलं तेच भाजपच्या राज्यात देखील होत आहे. बेईमानी करुन जगाणारे मोठे होते आहेत. मात्र श्रमाच्या आधारे जगणाऱ्यांना काही मिळत नाही. मजूर, शेतकरी, त्याचे काय त्यांना काही मिळत नाही. आमचा बाप शेतकरी आहे. त्यांच्याशिवाय आमचा पत्ता हलणार नाही,असा दावा त्यांनी केला होता.