महाविकास आघाडीत नव्या पक्षाची एन्ट्री होणार? 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा समावेश आहे. आघाडीत ही काही डावे पक्ष आहेत. अशा या महाविकास आघाडीत आणखी एक पक्ष येवू पाहात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होवू शकतात. त्यामुळे इच्छुक तयारीला लागले आहे. तर कोणी युती आघाडीत जागा मिळते का याचीही चाचपणी करत आहेत. महायुतीत सध्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. शिवाय अन्य छोटे पक्षही महायुतीचा भाग आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा समावेश आहे. आघाडीत ही काही डावे पक्ष आहेत. अशा या महाविकास आघाडीत आणखी एक पक्ष येवू पाहात आहे. त्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट या पक्षाच्या नेत्याने केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे विधानसभेलाही तसेच प्रदर्शन करण्याचा चंग आघाडीने केला आहे. शिवाय आघाडीत येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. या पार्श्वभूमिवर आता एमआयएमही आघाडीत येण्यासाठी दरवाजे ठोठावत आहे. महाविकास आघाडीने एमआयएमलाही सोबत घ्यावे. आम्ही तुमच्या बरोबर येण्यास तयार आहोत असे वक्तव्य माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. शिवाय याबाबत आघाडीच्या नेत्यां बरोबर आपली चर्चा झाली आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसचा बालेकिल्ला भाजप भेदणार? कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना कोणाचे आव्हान?

ही चर्चा काही तास झाली असा दावाही त्यांनी केला. जेवढी एमआयएमची ताकद आहे तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात असेही आपण आघाडीच्या नेत्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. मात्र याबाबत आघाडीकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीत आपल्याला घेतल्यास आपण शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या यांच्या बरोबरीने बसू. हे काही जणांना आवडलं नाही. त्यामुळे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा जलील यांनी केला आहे. नागपूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार

एमआयएमने लोकसभेला छत्रपती संभाजीनगरची जागा लढवली होती. खासदार असलेल्य इम्तियाज जलील यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. पण त्यांचा त्यात पराभव झाला. त्यानंतर जलील यांनी आघाडी सोबत विधानसभेला जाण्याची तयारी दाखवली होती. पण एमआयएमला बरोबर घेण्यास काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाचे  विरोध दर्शवला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप याआधीही काँग्रेसने केलेला आहे. अशा वेळी एमआयएमला सोबत घेणे काँग्रेसला परवडणारे नाही. मात्र जलील यांनी आघाडीत येण्या विषयी चर्चा झाली आहे हा गौप्यस्फोट करून आघाडीमध्येच खळबळ उडवून दिली आहे.  

Advertisement