बंडखोरी अटळ? भाजपचा बडा नेता कामाला लागला,दादांचे टेन्शन वाढले

हा नेता राज्यात मंत्री ही राहीला आहे. त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. यातून आता महायुतीचे नेते कोणता मार्ग काढतात याकडे संपुर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे

विधानसभेच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहे. महायुतीमध्ये काही जागा या अडचणीच्याच ठरणार आहेत. त्याची प्रचेती आता पासूनच यायला लागली आहे. त्यामुळेच भाजपचा एक बडा नेता आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. खरं तर हा मतदार संघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. अशा स्थितीत आपला पत्ता कट होणार हे भाजपच्या नेत्याला समजले आहे. त्यातूनच त्यांनी अपक्ष म्हणून आपली तयारी सुरू केली आहे. हा नेता राज्यात मंत्री ही राहीला आहे. त्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे. यातून आता महायुतीचे नेते कोणता मार्ग काढतात याकडे संपुर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पुणे जिल्ह्यात इंदापूर विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात भाजपनेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मोठी ताकद आहे. पण मागिल दोन निवडणुकांत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे सध्या आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला सुटणे अवघड आहे. अशा स्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष लढण्याचे हत्यार उपसल आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची  शाखाच स्थापन केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर; देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार?

हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अजित पवार जागा सोडणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे पिढ्यानपिढ्याचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. 1995, 1999 आणि 2004 या तीन निवडणुका हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष लढविल्या. त्या त्यांनी जिंकल्यात ही होत्या.अजित पवारांच्या त्रासाला कंटाळूनचं हर्षवर्धन पाटलांनी 2019 ला काँग्रेस सोडली होती. पण तेच अजित पवार आता हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय प्रवासात अडसर ठरतील अशी स्थिती आहे. ही जागा महायुतीत अजित पवार सोडणार नाहीत त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी -  कोल्हापूर ते पॅरिस, जग जिंकणाऱ्या मराठमोळ्या स्वप्निलची 'अनटोल्ड स्टोरी'

2014 आणि 2019 ला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केलाय. या दोन्ही पराभवाचा वचपा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून कंभर कसली आहे. भरणेंचा पराभव करण्यासाठी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचं हत्यार उपसलं आहे. याची पहिली शाखा बावडा गावात स्थापन करण्यात आली आहे.  21 ऑगस्टपर्यंत तालुक्यात शंभर शाखा उघडल्या जाणार आहेत. मागील काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलां अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी चर्चा आहे. आता या चर्चांना कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आहे. 

Advertisement