
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. निष्ठा हा विषय सध्या राजकारणात दुर्मिळ झाला आहे. आज या पक्षात असलेला नेता कधी त्या पक्षात जाईल याचा नेम नाही. त्यात आता सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. आपल्याला पण मंत्रिपद मिळावं, भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन असं थेट वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. शिवाय ते कोणत्या पक्षात जाणार याचीही चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपल्याला पण मंत्रिपद मिळावं,अशी भावना सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटल यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे ही उपस्थित होते. या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, योगायोग आहे मी पण पहिल्यांदा अपक्ष खासदार म्हणून निवडून आलो आहे. जयकुमार गोरेही अपक्ष म्हणूनच आमदार झाले. पुढे ते मंत्री ही झाले. ते अपक्ष न राहाता ते भाजपमध्ये गेले आणि मंत्री झाले असे सुचक वक्तव्य ही खासदार पाटील यांनी यावेळी केले.
भविष्यात मी काँग्रेस सोबत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन. शिवाय जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही पण पुढे जावे अशी, असं आपल्याला वाटतं असं ही ते यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. खासदार विशाल पाटील मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवाय काँग्रेस बरोबर नाही तर अन्य पक्षात जाईन या वक्तव्यानेही काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. पाटील भाजपच्या वाटेवर आहेत का ? याची चर्चा या निमित्ताने सांगलीत सुरू झाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO News: सिडकोची परत एक मुदत वाढ, माझे पसंतीचे घर योजने आता नवा ट्वीस्ट
सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेली होती. असं असताना विशाल पाटील हे सांगलीतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. अशा स्थितीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची साथ लाभली होती. विश्वजित कदम यांनी त्यावेळी पाटील यांनी छुपी साथ दिल्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या प्रयत्नामुळेच विशाल पाटील हे लोकसभेत पोहोचले होते. विजयी झाल्यानंतर विश्वजित कदम विशाल पाटील यांनी दिल्लीत घेवून गेले होते. त्याची खरगे, राहुल गांधी यांची भेट घालून दिली होती. शिवाय पाटील यांनी काँग्रेसला ही पाठिंबा जाहीर केला होता. आता मात्र पाटील यांची भूमीका बदलली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world