
सिडको माझे पसंतीचे घर योजने अंतर्गत 26,000 घरांची लॉटरी काढली गेली. त्यातील 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे. यातील लॉटरी विजेत्यांना इरादा पत्र पाठवण्यात आली. त्यानंतर कागपत्रांची पडताळणी ही झाली. कागद पडताळणीत यशस्वी झालेल्या लॉटरी विजेत्यांना कन्फर्मेशन पत्र ही पाठवण्यात आले. या अंतर्गत 75,000 रुपये भरून आपले पसंतीचे घर कन्फर्म करता येणार होते. त्यासाठी ज्या दिवशी कन्फर्मेशन पत्र देण्यात आले आहे त्या दिवसाच्या पंधरा दिवसा आत हे पैसे भरायचे होते. पण त्यात आता ट्वीस्ट आला आहे. सिडकोने त्यासाठी ही आता मुदतवाढ दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर सिडको विजेत्यांना 75,000 हजार रुपये भरायचे होते. ही रक्कम EWS धारांसाठी होती. LIG साठी वेगळी रक्कम आहे. ही रक्कम 15 दिवसात भरायची होती. त्यानंतर अलॉटमेंट लेटर दिलं जाणार होतं. पण आता हा पंधरा दिवसाचा कालावधी सिडकोने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसा ऐवजी आता ही रक्कम 28 दिवसात भरण्याची मुदतवाढ सिडकोने लॉटरी विजेत्यांना दिली आहे. त्या बाबतची सुचना सिडको लॉटरी विजेत्यांना सिडकोच्या पोर्टलवर पाहायला मिळत आहे.
या सुचनेत पुष्टीकरण रक्कम म्हणजेच Confirmation Amount भरण्याच्या मुदतवाढीबाबत सूचना असं म्हटलं आहे. पुढे आपणास यापूर्वी कळविण्यात आले होते की, पुष्टीकरण रक्कम भरण्याबाबतचे Confirmation Amount पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत पुष्टीकरण रक्कम भरावी. आता सिडको महामंडळाने सदर कालावधीत वाढ करून 28 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या अर्जदारांना पुष्टीकरण रक्कम भरण्याबाबतचे (Confirmation Amount) पत्र प्राप्त झालेले आहे, अशा सर्व अर्जदारांनी पत्र प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 28 दिवसांच्या आत पुष्टीकरण रक्कम भरावी, ही विनंती. असे या सुचनेत नमुद करण्यात आले आहे.
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे. तर उर्वरीत लोकांना सिडकोच्या शिल्लक राहीलेली घरं देण्यात आली आहेत. लॉटरी लागल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न लॉटरीत विजेत्या ठरलेल्या सदनिकाधारकांना पडला होता. आता त्यांना घराचा ताबा मिळेलपर्यंत वेगवेगळ्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. या प्रक्रियेला वेळ लावू नये अशी मागणी सिडको लॉटरी विजेत्यांची होती.
त्यानुसार विजेत्या लॉटरीधारकांना लेटर ऑफ इंटेन्ट म्हणजेच इरादा पत्र देण्यात आले आहेत. हे इरादापत्र ऑनलाईन उपलब्ध झाले आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी ही केली गेली आहे. यात ज्या विजेत्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली आहे त्यांना Confirmation Amount पत्र पाठवण्यात आली आहे. मात्र इथं आता सिडकोने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. ही रक्कम पंधरा दिवसात भरायची होती. ती आता 28 दिवसात भरायची आहे. त्यामुळे पुढच्या प्रक्रीयेलाही आता आणखी वेळ लागणार आहे. त्यानंतर अलॉटमेंट लेटर मिळेल. ते मिळाल्यानंतरच गृह कर्जाची प्रक्रिया ही सुरू करता येणार आहे. शिवाय घराचा ताबा कधी मिळणार याची ही निश्चित तारीख लॉटकीधारकांना समजणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world