Malegaon News : मालेगावात 'इस्लाम'ची सरशी, महापौरपदाच्या निवडणुकीचं चित्रच पालटलं, BJP आणि MIM नगरसेवकांनी..

मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची यांची वर्णी लागली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Malegaon Mayor And Deputy Mayor

निलेश वाघ, प्रतिनिधी

Malegaon Mayor News : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख खालिद तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद यांची यांची वर्णी लागली आहे.विशेष म्हणजे महापालिकेत सुरवातीपासून अलिप्त राहणाऱ्या  भाजप व एमआयएमने तटस्थ राहणे पसंत केले.या निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर राज्यात इस्लाम पार्टीचा विस्तार होईल, असं इस्लाम पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत नसरीन शेख यांनी शिवसेनेच्या लता घोडके यांचा 25 मतांनी पराभव केला. शेख यांच्या बाजूने इस्लाम पार्टीच्या 35 तर,समाजवादी पार्टी 5 व काँग्रेस 3 अशा 43 नगरसेवकांनी मतदान केले.तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शान ए हिंद निहाल अहमद यांनी शिवसेनेच्या निलेश काकडे यांचा पराभव केला. एमआयएम 21 व भाजप 2 नगरसेवक या निवडणुकीत तटस्थ राहिले. 

शेख यांनी केला शिवसेनेच्या घोडकेंचा पराभव

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीनंतर इस्लाम,समाजवादी पार्टी व काँग्रेस पक्षाच्या सेक्युलर फ्रंटने एकच  जल्लोष केला.तर समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच हिरवा गुलाल उधळत इस्लाम व समाजवादी पार्टीचे ध्वज फडकवत जल्लोष केला.महापौर पदाच्या निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर नसरीन बानो यांना अश्रु अनावर झाले . सासरे स्वर्गीय माजी आमदार व माजी महापौर रशीद शेख यांची त्यांनी आठवणही काढली.

नक्की वाचा >> Pune News : सोयी-सुविधांचा अभाव, यंत्र बिघाड अन् पोलिसांची अरेरावी.. मतदानादिवशीच नागरिकांनी घेतला मोठा निर्णय

सेक्युलर फ्रंटसह सर्वच पक्षाचे मानले आभार मानले. "मालेगाववर लादण्यात आलेल्या बनावट जन्म दाखला घोटाळाप्रकरणी एसआयटी चौकशीप्रकरणी कायदेशीर लढाई लढू तसेच हिंदू - मुस्लिम व  सर्व जाती धर्माच्या घटकाना सोबत घेऊन शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी प्रयत्न करेल" अशी ग्वाही महापौर शेख यांनी दिली. "आम्ही शहराच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली.आज दोन महिला प्रथमच मालेगावच्या महापौर व उपमहापौर पदाची संधी मिळाली.आम्ही शहराचा विकास करून पूर्व व पश्चिम  वाद संपवू",असं आश्वासन उपमहापौर शान ए हिंद यांनी दिले.

मालेगावात इस्लाम पार्टी ठरली सरस

मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पार्टी व समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटने सर्वाधिक 40 जागा मिळविल्या होत्या .बहुमतासाठी त्यांना अवघ्या 3 जागा कमी पडत होत्या.काँग्रेसच्या 3 नगरसेवकांनी हात दिल्याने त्यांनी मॅजिक फिगर गाठली होती.तर महापौर व उपमहापौर निवडीच्या दोन दिवस अगोदर एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्याने नवा ट्विस्ट आल्याने संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.सुरवातीपासून इस्लामची सत्ता येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र मालेगाव जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे.आमचा महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित होते.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : मतदानाच्या दिवशीच पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळील व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 160 मतदारांनी..

 राज्यात एमआयएम दिला पर्याय

इस्लाम पार्टीने सर्वाधिक जागा मिळविल्यानंतर पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या.सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजपनेही गट स्थापन केला तर दुसरीकडे एमआयएमनेही शिवसेनेच्या मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत चाचपणी केली. मात्र याबाबत जास्त चर्चा झाल्याने एमआयएमच्या प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील दोन पाऊल मागे आले.आम्ही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही.आम्ही तटस्थ राहू अशी घोषणा त्यांनी केली.तर या निवडणुकीच्या निमित्ताने इस्लाम पार्टी एमआयएमला पर्याय दिला आहे आणि आम्ही आता राज्यभर इस्लाम पार्टीचा विस्तार करू अशी प्रतिक्रिया इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी दिली आहे.