जाहिरात

Pune News : मतदानाच्या दिवशीच पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळील व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 160 मतदारांनी..

पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावर प्रशासनाने कंबर कसलीय. लोकशाहीचा महाऊत्सव साजरा करण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अत्यंत कठीण प्रवास केला.

Pune News : मतदानाच्या दिवशीच पुण्यातील रायरेश्वर किल्ल्याजवळील व्हिडीओ व्हायरल, 'त्या' 160 मतदारांनी..
Pune Raireshwar Fort Video Viral
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pune Raireshwar Fort Viral Video : राज्यात आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रकिया पार पडत आहे. मतदार सकाळपासूनच आपापल्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावर प्रशासनाने कंबर कसलीय. लोकशाहीचा महाऊत्सव साजरा करण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अत्यंत कठीण प्रवास केला. अवघ्या 160 मतदारांसाठी प्रशासनाने तारेवरची कसरतच केलीय.मतदानाचा हक्क बजावणे लोकशाहीत किती महत्त्वाचं आहे, याचा संदेशच प्रशासकीय यंत्रणांनी दिला आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांनी पुण्याहून पायथ्यापर्यंतचा 40 किमीचा प्रवास वाहनाने केला.मात्र,खरा प्रवास तिथून पुढे सुरू झाला.जवळपास एक तासाची उभी चढण,वळणावळणाची पायवाट आणि लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी साहित्यासह रायरेश्वरचे पठार गाठले. 

नक्की वाचा >> Viral Video : नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End, कोकणातील उत्कृष्ट क्रिकेटपटू हरपला, मॅचमध्ये काय घडलं? 

रायरेश्वरच्या पठारावरील 160 मतदार आता...

दुर्गम भागातील प्रवासासाठी केंद्र निवडणूक आयोगाने दिलेले विशेष बॅकपॅक्स कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विकास खरात यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.एवढ्या दमछाक करणाऱ्या चढाईनंतरही,लोकशाही प्रक्रियेचा भाग असल्याचा आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.प्रशासनाच्या या नियोजनामुळे आता रायरेश्वरच्या पठारावरील 160 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

नक्की वाचा >> Video: आयुष म्हात्रेच्या पालघरच्या घरी तिरंगा फडकला, अनेक ट्रॉफींनी भरलाय घरचा हॉल, 'त्या' एका फोटोने मात्र..

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती

भोर तालुक्यात प्रामुख्याने महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी (शिवसेना-ठाकरे गट, राष्ट्रवादी-शरद पवार गट, काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही आव्हान उभे केले आहे.भोरमधील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी हे  287 केंद्रावर मतदान होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com