जाहिरात

Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत

Sunetra Pawar Gungi Gudiya Remark : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Sunetra Pawar: 'सत्ता बदलत राहते, पण...' आईला 'गुंगी गुडीया' म्हटल्यानंतर जय पवारांची 'ती' पोस्ट चर्चेत
Sunetra Pawar Gungi Gudiya Remark : सुनेत्रा पवारांवर टीका होताच जय पवार मैदानात उतरले आहेत.
मुंबई:

Sunetra Pawar Gungi Gudiya Remark : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावेळी सुनेत्रा पवार यांचे  पुत्र जय पवार यांनी याविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. माझ्या आईचा 'गुंगी गुडीया' म्हणून केलेला अपमान हा केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या राहणाऱ्या प्रत्येक महिलेच्या स्वाभिमानावर झालेला आघात आहे, अशा अत्यंत कडक आणि भावूक शब्दांत जय पवार यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानाचे समर्थन करत विरोध कायम ठेवल्याने तापलेल्या या वातावरणात जय पवार यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

'राजकारण विचारांचे असावे, महिलांच्या अवमानाचे नाही'

जय पवार यांनी त्यांची पोस्टमध्ये राजकीय संस्कृतीवर भाष्य करत काँग्रेसच्या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. लोकशाहीत राजकीय मतभेद आणि धोरणांवर टीका होणे स्वाभाविक असले, तरी महिलांची प्रतिष्ठा कमी करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत समाजात स्वीकारली जाऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकारण हे कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असावे, असा टोला लगावतानाच आज मी केवळ एका आईच्या पाठीशी नाही, तर देशातील प्रत्येक कर्तृत्ववान महिलेच्या सन्मानासाठी ठामपणे उभा आहे, असा  इशाराही त्यांनी दिला आहे.

( नक्की वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची बोचरी टीका; 'गुंगी गुडीया' शब्दावरून NCP आक्रमक, वातावरण तापलं! )

काय आहे जय पवार यांची संपूर्ण इन्स्टाग्राम पोस्ट?

'माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी वापरलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर समाजात मानाचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह आघात आहे.

माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात; परंतु महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तिमत्त्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही.

राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते—महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरूर असावेत; पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मूल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )

आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्विवाद राहिलाच पाहिजे.

Latest and Breaking News on NDTV

Latest and Breaking News on NDTV

राजकारणात विजय-पराजय होत राहतात, सत्ता बदलत राहते; पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे प्रत्येक विधान केवळ निषेधार्हच नाही, तर लोकशाही संस्कृतीलाही काळिमा फासणारे आहे,' या शब्दात जय पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com