जाहिरात

Sangli News: अजित पवारांच्या NCP चा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' आमदाराच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ

आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनामेची मागणी खुद्द राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केली आहे.

Sangli News: अजित पवारांच्या NCP चा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, 'या' आमदाराच्या राजीनाम्याच्या मागणीने खळबळ
Sangli NCP Political Internal Clash

शरद तासपुते, प्रतिनिधी 

Sangli NCP latest News : आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनामेची मागणी खुद्द राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केली आहे.या निमित्ताने पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार इद्रिस नायकवडी हे स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आरोग्य शिबिराच ढोंग करत आहेत.अजित पवार आणि पक्षाने त्यांना दोन वर्षांचा कार्यकाळ आमदारकीसाठी दिला होता.

"अजित पवार यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर.."

"दोन वर्षे उलटूनही ते आमदारकीचा राजीनामा देण्यास नकार देत आहेत. अजितदादांच्या जाण्याने नायकवडी यांना दुःख नसून आनंद झाला आहे.मुस्लिम समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. पण या दोन वर्षात समाजासाठी सभागृहात एकही प्रश्न मांडला नाही,असा आरोप बागवान यांनी केला आहे. अजित पवार यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा, हीच खरी श्रद्धांजली असेल. असे मत माजी नगरसेवक जमील बागवान यांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> Gadchiroli News: गडचिरोली हादरलं! आई-वडील होते शेतात, चार मुलं सती नदीवर गेली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

"सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी नायकवडी यांचा राजीनामा घ्यावा"

आमदार नायकवडी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी नायकवडी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बागवान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.सांगली कुपवाड मिरज महापालिका निवडणुकीपासून इद्रीस नायकवडीवर फार मोठा विश्वास होता. नायकवडी यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं असतं, तर अजितदादाच्या शब्दाला मान दिला असता,पक्षाचा इमानदारीने काम केलं असतं.तर आज राष्ट्रवादीचा महापौर झाला असता,असंही बागवान यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीच्या 'या' मुख्य रस्त्यांची चाळण, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना होतोय प्रचंड त्रास

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com