माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. शिवाय हा अर्थसंकल्प कसा स्वप्न दाखवणारा आहे, हे पण सांगितलं. सरकारकडे पैसे नाहीत. पैसे कुठून आणणार याचा पत्ता नाही. महसूली तुट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियंत्रण कसे आणणार? या आणि यासारखे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहे. लाडकी बहिण योजनेचं पुढे काय होणार याबाबत ही त्यांनी भाकित व्यक्त केलं आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होत्या. पुढच्या 15-20 वर्षात काय करू शकतो त्याचे स्वप्न दाखवण्याचा हा एक चांगला कार्यक्रम होता असं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. पण त्यासाठी गुंतवणूक किती लागणार? पैसे कसे उभे करणार? सरकार कर्ज किती काढणार? हे सांगणं गरजेचं होतं. पण ते काही सांगितलं गेलं नाही. घोषणांना विरोध नाही. पण खर्च किती येणार? हे सांगितलं पाहीजे होतं असं जयंत पाटील म्हणाले.
सध्याच्या स्थितीत 45 हजार कोटी पेक्षा जास्त महसूली तूट दाखवली आहे. तर राजकोषीय तुट ही 1 लाख 36 हजार कोटी दाखवली आहे. हे धक्कादायक आहे, असं जयंत पाटील म्हणाले. ही महसूली तूट दीड लाख कोटीपर्यंत जाईल असा अंदाज ही त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात किती आकडे वगळले आहेत हे पहावे लागेल. ते आकडे समोर आल्यानंतर महसूली तूट ही 45 हजार कोटी वरून 60-70 हजार कोटींवर जाईल असं ही ते म्हणाले. हीबाब राज्याच्या दृष्टीने चिंतेची असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
मागिल अर्थसंकल्पात ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्यावरचे पैसे खर्च झालेले नाहीत असं जयंत पाटील यांनी सांगितलं. काही विभागांना पैसे मिळाले नाहीत. व्याज काढण्याची मुभा सरकारला आहे. पण सरकाने उत्पन्न वाढवण्याची ही गरज आहे असंही त्यांनी सांगितले. त्यातून व्याजाचा बोजा कमी येईल. असंही ते म्हणाले. जर तसं झालं नाही तर विकासकामावरिल खर्च हा कमी होतो. त्याच परिणाम राज्याच्या विकासावर होतो. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान लाडकी बहिण योजनेचं काय होणार याबाबतही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ही योजना सरकार बंद करेल असं वाटत नाही. पण 2100 रुपये हे ते आताच देणार नाहीत. हे पैसे ते विधान निवडणुकीच्या तोंडावर देतील असं जयंत पाटील म्हणाले. तोपर्यंत वेगवेगळे निकष लावले जातील. आता 10 लाख महिला बाद झाल्या आहेत. ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. राज्याला आर्थिक शिस्त राहीली नाही असंही पाटील म्हणाले. ती असती तर महसूली तुट दिसली नसती असंही त्यांनी सांगितलं.