पुढचा अर्थमंत्री कोण ते ठरलं, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या 'या' नेत्याच्या हातात जाणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सांगितलं.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

विधानसभा निवडणुका अजून व्हायच्या आहेत. निकाल लागायचा आहे. कोणाची सत्ता येणार हे पण ठरायचे आहे. असं असतानाही कोण मुख्यमंत्री होणार? कोण मंत्री होणार? कोणाला कोणतं खातं मिळणार? याची चर्चा आता पासूनच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणार हे सांगितलं. पण हे सांगत असताना पुढचा अर्थ मंत्री कोण असेल हे नावही जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच सत्ता येण्या आधी खातेवाटपही झाले आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जालन्यातील घनसावंगीमध्ये पोहचली आहे. यावेळी झालेल्या सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेश टोपे यांचं मनभरून कौतूक केलं.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजेश टोपे यांना अनेक प्रलोभने दिली गेली. मात्र त्यांनी शरद पवारांवरील निष्ठा कमी होऊ दिली नाही. विधान सभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.त्यामुळे परमेश्वर कृपेने त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्याही येऊ शकतात असं सांगत राजेश टोपे यांना अर्थमंत्रीपद देण्याचे संकेत दिलेत.

ट्रेंडिंग बातमी - जरांगे निवडणूक लढवण्याच्या तयारीत, आतापर्यंत 150 अर्ज; माजी आमदार-आमदारपुत्राचाही समावेश 

विधानसभेत पराभव होईल म्हणून आता हे सरकार कोणत्याही योजना जाहीर करत आहेत असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.  त्यांच्या त्यांच्या  मंत्रालयात वाद होत आहेत. योजनेच्या नावावरून वाद होत आहेत असं ही त्यांनी सांगिले. लोकसभेत जनतेने हिसका दाखवला आहे.  त्यांमुळे अनेक गोष्टी अचानक सरकारला लाडक्या झाल्या आहेत  असा टोलाही त्यांनी सरकारला हाणला आहे. यावेळी त्यांनी राजेश टोपे यांना सरकारमध्ये प्रमोशन मिळणार याचेच संकेत दिले आहेत. 

नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी ही जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांच्या निशाण्यावर नेहमी प्रमाणे अजित पवार होते. अजित पवारांना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानी काळे झेंडे दाखवले. यावरून लाडकी बहीण नक्की कुणाची यावरुन आता महायुतीत वाद होत आहेत.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात  खटके उडत आहेत असा टोला कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे या यात्रेत होणाऱ्या प्रत्येक घडामोडीकडे सर्वाचे लक्ष आहे. या यात्रेत जरी सरकारवर टिका केली गेली असली तरी राजेश टोपे यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या या मुळे सर्वांचेच कान टवकारले आहेत.  

Advertisement