एकीकडे विधानसभेची तयारी राज्यात जोरदार सुरू आहे. असं असताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एक वक्तव्य करत राजकीय वर्तूळात खळबळ उडवून दिली आहे. विधानसभेची धामधूम सुरू असताना दिल्लीत मोठ्या उलाढाली होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यासाठी दिल्लीत शरद पवार सध्या ठाम मांडून बसले आहेत असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले. पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनाला शरद पवारही उपस्थित राहाणार होते.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशन सध्या पंढरपूर येथे पार पडत आहे. या अधिवेशनाला शरद पवार येणार होते. शिवाय ते मार्गदर्शनही करणार होते. पण त्यांना काही कारणास्तव यायला भेटले नाही. पवार अधिवेशनाला का आले नाहीत याचे स्पष्टीकर जयंत पाटील यांनी दिले आहे. देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उलाढाली होणार आहेत. यासाठी आपण शेकाप अधिवेशनसाठी येऊ शकणार नाही. अशी माहिती खुद्द शरद पवार यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना दिली. हीच माहिती जयंत पाटील यांनी शेकाप अधिवेशनात जाहीर पणे सांगितली. यानिमित्ताने देशाच्या राजकारणात काही तरी नव्या घडामोडी दिल्लीतील राजकारणात होत असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
पंढरपुरात शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशनासाठी येणार होते. मात्र पवार यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. पवार यांनी दौरा रद्द करत असताना जयंत पाटील यांना फोन केला. शिवाय आपण का येऊ शकत नाही याचे कारणही सांगितले. दिल्लीतील उलाढालीमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे कारण त्यांनी सांगितले. पवार यांनी सांगितलेल्या कारणामुळे देशाच्या राजकारणात काही तरी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपण दिल्लीतील भाजपा सरकार पाडुनच शेकापच्या कार्यक्रमाला या. आम्ही आपले आनंदाने स्वागत करू, असे सांगितले.