Jitendra Awhad on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गडचिरोलीतील सभेत गेल्या शनिवारी (7 सप्टेंबर) केलेलं वक्तव्य चांगलंच गाजत आहे. कुटुंबात फूट पाडण्याची चूक करायला नको. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझी चूक मी मान्य केली आहे, असं अजित पवार म्हणाले. यापूर्वी देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी जकारणात कोणालाही घरात घुसू द्यायला नको. माझी पत्नी सुनेत्राला माझ्याच बहिणीविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकीचा होता, हे वक्तव्य केलं होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवारांच्या त्या वक्तव्यानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार का? ही चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी NDTV मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये आव्हाड यांनी या विषयावर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आव्हाड ?
अजित पवार यांना परत घ्यायला माझा विरोध नाही. हा पक्ष शरद पवारांचाच आहे. ते याबाबत अंतिम निर्णय घेतील. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षात सर्वांशी चर्चा करण्याची शरद पवारांची पद्धत आहे. अजित पवारांना पक्षात घ्यायचं की नाही हा अधिकार शरद पवारांचा आहे. तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं आव्हाडांनी सांगितलं.
( नक्की वाचा : 'तुम्ही 'पिंक' झालात आणि घाबरून का गेलात?' कार्यकर्त्याचा अजित पवारांना झणझणीत सवाल )
अजित पवारांना घर फुटल्याचं दु:ख होत असेल तर ते चांगलं आहे. पण, हे घर फुटलंच नाही. बारामती लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण घर सुप्रिया सुळे यांच्यासोबतच होतं, हे दिसलं आहे, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय विघ्न दूर होवो, अशी गणरायाला प्रार्थना केली आहे. महाविकास आघाडीचं मुंबईतील जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. गणपतीनंतर आमच्या पुन्हा या विषयावर बैठका होतील, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केले.