जाहिरात

Karuna Munde: करुणा मुंडेंचे राजीनाम्याबाबतचं वक्तव्य खरं ठरलं, पण तारीख हुकली

करुणा मुंडे यांनी दिलेली वेळ आणि तारीख मात्र चुकली. असं असलं तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली.

Karuna Munde:  करुणा मुंडेंचे राजीनाम्याबाबतचं वक्तव्य खरं ठरलं, पण तारीख हुकली
मुंबई:

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणार आहेत हे स्पष्ट होतं. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यांना राजीनामा हा फिक्स होता. पण तो कधी दिली जाणार हे कुणालाही माहित नव्हते. पण धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी राजीनाम्याची वेळ आणि तारीख सांगितली होती. त्यांनी याबाबतचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनं ट्वीस्ट निर्माण झाला होता. पण त्यांनी राजीनाम्याचं केलेलं भाकीत हे खरं ठरलं. पण तारीख आणि वेळ मात्र चुकली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकारची कोंडी झाली आहे. अशा वेळी धनंजय मुंडे यांचं राजीनामा देण्याचं ठरलं होतं. त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला आहे, असा दावा दोन दिवसापूर्वी करुणा मुंडे यांनी केला होता. हा राजीनामा  तीन तारखेला स्विकारला जाईल असंही त्यांनी सांगितलं होतं. राजीनामा देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला होता. शिवाय ज्या पद्धतीने हत्येचे फोटो व्हायरल झाले, त्यानुसार धनंजय मुंडे यांचा बचाव करणं अजित पवारांनाही कठीण झालं होतं. शेवटी त्यांनी राजीनामा घेतला. 

(नक्की वाचा-  संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)

करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत काय भाष्य केलं होतं ते ही पाहूयात. त्यांनी जे ट्वीट केलं होतं ते दोन मार्चला करण्यात आलं होतं. धनंजय मुंडेंचा दोन दिवसांपुर्वीच राजीनामा झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा ही उद्या म्हणजे 3 फेब्रुवारीला अधिवेनशाच्या पहिल्या दिवशी होईल असं त्यांनी म्हटलं होतं. करुणा मुंडे असं ही  म्हणाल्या होत्या, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलाय. उद्या म्हणजे सोमवारी शंभर टक्के राजीनामा होणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे कोण? CM फडणवीसांच्या प्रतिक्रियेने राजकारणात खळबळ; म्हणाले...

पण करुणा मुंडे यांनी दिलेली वेळ आणि तारीख मात्र चुकली. असं असलं तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली. एक दिवस उशीराने का होईना पण मुंडे राजीनामा झाला.पण ही बातमी करुणा मुंडे यांना कुणी दिली याबाबत आता चर्चा सुरू आहे. वाल्मीक कराड दोषी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. आक्रमक विरोधकांसमोर महायुतीची पहिली विकेट या निमित्ताने पडली आहे.