
माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत आहेत. या प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. त्याचवेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी देखील कायम आहेत. 'धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी असून त्यामुळे आपल्याला पोटगी द्यावी' अशी याचिका करुणा शर्मा यांनी दाखल केली होती. मुंबईच्या न्यायालयानं या प्रकरणात करुणा शर्मा यांच्या बाजूनं निकाल दिला होता. आता त्यापाठोपाठ सत्र न्यायालयानं देखील करुणा शर्मा यांना दिलासा देत मुंडे यांना धक्का दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
करुणा आणि धनंजय यांचे संबंध लग्नासारखेच
करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहेत, असं मत सत्र न्यायालयानं दिले आहेत. या दोघांनी दोन मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदावलं आहे.
धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदावलं. करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा दावा मुंडे यांनी केला होता. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं मत सत्र न्यायालयानं नोंदवलं.
( नक्की वाचा : Karuna Sharma : 'मला प्रेमात पाडण्यासाठी 20 कोटींची ऑफर, मुलीला उचलून...' करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप )
एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी त्यांच्या आदेशांत स्पष्ट केले आहे.
करुणा यांनी सादर केले होते पुरावे
यापूर्वी या प्रकरणाच्या माझगाव कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव मृत्यूपत्र सादर केलं. त्यामध्ये करुणा मुंडे यांच्या नावासमोर पहिली पत्नी तर राजश्री मुंडे यांच्या नावासमोर दुसरी पत्नी असा उल्लेख आहे, असा दावा त्यांनी केला.
धनंजय मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा दिल्याचा करुणा मुंडे यांनी दावा केला. त्याचबरोबर आम्ही 27 वर्ष सोबत राहिलो आहोत असंही त्यांनी कोर्टात सांगितलं. आमचं जॉईंट बँक अकाऊंट आहे. पॉलिसी आहे. परळी पोलिस ठाण्यात माझ्या लग्नाचे पुरावे देखील आहेत, असं करुणा यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोर्टात धनंजय मुंडे यांनी त्यांचा पत्नी असल्याचं स्विकृतीपत्रक देखील सादर केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world