भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मुस्लीम समाजाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहे. मुस्लीम समाजाची मते भाजपला मिळत नाहीत. या समाजाने भाजपला मतदान केल्यास त्यांनाही खासदार किंवा मंत्री केले जाईल,अशी भूमिका केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी मांडली आहे.या समाजाने भाजपला मतदान केले नाही तर, त्यांना सत्तेत संधी मिळणार नाही, असा दमही भरला आहे. एकीकडे आम्हाला मतदान करा तुम्हाला सत्ता देऊ असं सांगितलं आहे. तर दुसरीकडे मतदान केलं नाही तर सत्तेची संधी मिळणार नाही असंही बजावलं आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकामुळे मुस्लीम समाजाच्या जमिनी काढून घेतल्या जाणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करत असल्याची टीका रिजूजी यांनी यावेळी केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्यघटना भवन उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून काही निधी दिला जाईल. तर काही निधीची उभारणी राज्य शासनाकडून करण्यात येणार आहे, असेही किरेन रिजिजू यांनी सांगितले.
मात्र त्यांनी मुस्लीमां बाबत केलेल्या वक्तव्या मुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी एककीडे मुस्लीम मतदारांना भाजपला मतदान करावे यासाठी हाक घातली आहे. जर मुस्लीम समाजाने भाजपला मतदान केले तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल. पण जर मतदान केले नाही तर त्यांना सत्ता मिळणार नाही असा दम ही भरला आहे. मुस्लीम मतदार हा नेहमी काँग्रेसच्या मागे उभा राहीला आहे. सध्या देशातील राजकीय स्थिती बदलत आहे. अशा वेळी भाजपला मुस्लीम मतांची गरज भासू लागली आहे असे रिजिजू यांच्या वक्तव्या वरून दिसून येत आहे.
ट्रेंडिंग बातमी - गरबा खेळत असताना भोवळ आली, खाली कोसळला, पुण्यामध्ये भयंकर घडलं
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मात्र भाजपचे काही नेते मुस्लीमां विरोधात टोकाची वक्तव्य करत आहेत. त्यात भाजप आमदार नितेश राणे हे आघाडीवर आहेत. त्यामुळे मुस्लीमांना नाराज करणे सध्याच्या स्थितीत योग्य नाही. त्यामुळेच की काय रिजिजू यांनी हे वक्तव्य केलं आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरू आहे.