फडणवीसांच्या जवळचा नेता शरद पवारांच्या गळाला? कोल्हापुरात मोठी उलथापालथ

महायुतीतील एक बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळख असलेले रमरजीत घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये अनेक जण उमेदवारी मिळावी म्हणून उत्सुक आहेत. पण अनेकांचा हिरमोड होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक परिस्थिती नुसार आघाडीतून युतीत तर काही जण युतीतून आघाडीत जाण्याच्या तयारीत आहेत. आता महायुतीतील एक बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळख असलेले रमरजीत घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची दाट शक्यता आहे. घाटगे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याचं समजत आहे. त्यामुळे कोल्हापुरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.    

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समरजीत घाटगे हे भाजपचे कोल्हापुरातले मोठे नेते आहेत. मागिल विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. तर समरजीत घाटगे ही याच ठिकाणावरून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र ही जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याने घाटगे यांना उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग धरल्याची चर्चा आहे. मंगळवारी त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  Video : बदलापूर पुन्हा हादरलं! बापाचं निर्घृण कृत्य, लेक-पत्नी बसलेल्या गाडीला समोरून जोरदार धडक 

कागल विधानसभा मतदारसंघ हा हसन मुश्रीफ यांचा गड मानला जातो. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर मुश्रीफांनी शरद पवारां ऐवजी अजित पवारांना साथ दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात समरजीत घाटगे  यांच्या रूपाने मजबूत उमेदवार शरद पवारांना घेतला आहे. समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा 23 तारखेला मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ते आपल्या पुढील वाटचालीची घोषणा करतील. शरद पवार 3 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.  यावेळी ते कागलच्या गैबी चौकात सभा घेणार आहे. याच सभेत  समरजीत घाटगे  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - अकोल्यातील ZP शाळेतील आठवीतील विद्यार्थिंनींसोबत संतापजनक कृत्य, शिक्षकाचे सहाजणींना...

तसे झाल्यास कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे यांच्यात सामना रंगणार आहे. इथं दोन्ही राष्ट्रवादी एकमेका विरुद्ध लढताना दिसतील. हसन मुश्रीफ महायुतीत आल्यानंतर  घाटगे हे नाराज होते. शिवाय हसन मुश्रीफ यांची उमेदवारीही अजित पवारांनी जाहीर करून टाकली आहे. त्यामुळे समरजीत घाटगे हे नाराज झाले होते. जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला जाणार हे घाटने यांना समजले आहे. त्यामुळेच त्यांनी वेगळा मार्ग निवडल्याची चर्चा आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस  कोल्हापुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहे. या कार्यक्रमाला घाटगे जातात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement