लाडकी बहिण योजनेचे पैसे सध्या महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.तर काहींना अजूनही पैसे मिळण्याची प्रतिक्षा आहे. सरकारने ही योजना म्हणजे गेम चेंजर असल्याचे सांगितले आहे. त्यात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा लातूर जिल्ह्यात आहे. यावेळी काही महिलांनी अजित पवार यांना गराडा घातला. त्यावेळी अजित पवारांनी या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले का? असा प्रश्न महिलांना केला. त्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले ते ऐकून अजित पवार पहातच राहीले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी काही महिलांची भेट घेतली. महिलांच्या गराड्यात असलेल्या महिलांना त्यांनी लाडक्या बहिण योजने बद्दल विचारले. खात्यात पैसे जमा झाले का? अशी विचारणा केली. त्यावेळी एका सुरात सर्व महिला नाही असं म्हणाल्या. त्यामुळे अजित पवारांना अवघडल्या सारखे झाले. त्यांनी लगेच पुढच्या महिलेला विचारले तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का? तिनेही उत्तर दिले नाही. लगेच तिसऱ्या महिलेला ही त्यांनी तोच प्रश्न केला. उत्तर मात्र तेच आले. मग तुम्ही कधी अर्ज केला होता, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर जून महिन्यातच केला होता असं उत्तर मिळालं.
ट्रेंडिंग बातमी - राजकोटवर फुल टू राडा! नारायण राणे म्हणतात 'घरातून खेचून रात्रीत मारून टाकेन'
त्यावर अजित पवारांनी जिल्हाधिकारी कुठे आहेत, अशी विचारणा केली. जिल्हाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. काय त्रुटी आहेत त्याकडे लक्ष द्या. अशी सुचना त्यांनी यावेळी केल्या. ज्या त्रुटी असतील त्या दूर करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ द्या असे त्यांनी यावेळी सांगितले. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तिन हजार रूपये राज्यातल्या महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
घरेलू काम करणाऱ्या महिलांना किंवा रोजंदारीने जाणाऱ्या महिलांना त्यांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याची मागणी लातूर मधील महिलांकडून यावेळी अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. सध्या महिलांना दोनशे रुपये इतके मानधन आहे. त्यामध्ये वाढ करून 500 रुपये इतकं मानधन मिळावं अशी मागणी महिलांकडून करण्यात आली. घरेलू काम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ करण्याची मागणी लातूर येथील महिलांकडून करण्यात आली आहे. या मागण्याचा नक्की विचार करू असे यावेळी अजित पवारांनी सांगितले.