लाडकी बहीण योजनेस पात्र होण्यासाठी eKYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यासाठी आता एक दिवस शिल्लक राहीला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी eKYC केली नाही त्यांची आता लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे एकाच वेळी अधिक महिला ही प्रक्रिया करत असल्याने eKYC करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली आहे ती हँग होत आहे. अनेक महिलांनी OTP मिळत नाही. ओटीपी सेंट होतो पण प्रत्यक्षात तो आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर मिळत नाही. त्यामुळे लाडक्या बहीणींचे टेन्शन वाढले आहे. त्यात आता eKYC ला मुदत वाढ मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्वीट करत पात्र महिलांनी ईकेवायसी करावी असं आवाहन केलं होतं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. असं त्यांनी आवाहन केलं होतं.
सुरूवातीला https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ई केवायसी करताना अडचणी येत होत्या. पण नंतर ही प्रक्रीया सुरळीत झाल्याचा दावा सरकारने केला होता. आता E-KYC करण्यासाठी एक दिवस शिल्लक राहीला आहे. त्याता लाडक्या बहिणींची चांगलीच धावपळ उडाली आहे. E-KYC करताना सुरूवातीची प्रक्रीया व्यवस्थित होत आहे. ओपीटी सेंट केल्याचा मेसेज ही येत आहे. त्यासाठी दहा मिनिटांचा वेळही दाखवला जात आहे. पण दहा मिनिटानंतरही ओटीपी काही मोबाईल क्रमांकावर येत नाही. त्यामुळे लाडक्या बहीणी चिंतेत आहेत.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
E-KYC करण्यासाठी आता फक्त एक दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट देत आहे. ट्राफीक वाढत असल्याने कदाचीत ओटीपीमध्ये गडबड होत आहे. काही महिला तर मध्यरात्री ही प्रक्रीया करत आहेत. मात्र तरीही त्यांची E-KYC होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे जर का 18 तारीख गेली तर पात्र असून ही अपात्र होण्याची टांगती तलवार या बहीणींवर आहे. त्यामुळे आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी अशी मागणी होत आहे. त्यावर आता राज्य सरकार आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय निर्णय घेतात याकडे सर्व लाडक्या बहीणींचे लक्ष लागले आहे.