लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

सप्टेबर महिना संपत आला तरी दिड हजार रूपये खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहिण चिंतेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही लोकप्रिय ठरत आहेत. या योजनेत महिलांना दरमहा दिड हजार रूपये दिले जात आहेत. या योजनेतील पहिले दोन हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जमा झाले आहेत. मात्र तिसरा हफ्ता अजून जमा झालेला नाही. सप्टेबर महिना संपत आला तरी दिड हजार रूपये खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहिण चिंतेत आहे. हा हफ्ता सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा केला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र कोणत्या तारखेला ते जमा होतील हे मात्र त्यांनी सांगितलं नव्हतं. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे पैसे किती तारखेला जमा होतील ती तारीख सांगितली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिले जाणार आहेत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. हे पैसे 29 सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतील अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ज्या महिलांनी उशीरा अर्ज केले आहेत. त्यांनाही दोन महिन्याचे एकदम पैसे खात्यात जमा केली जातील. या योजनेत नाव न नोंदवणाऱ्या महिलांसाठी सरकारने मुदत वाढ दिली होती.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी आदिती तटकरे यांनी आढाव बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान 29 सप्टेबरला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा  राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा ही त्यांनी यावेळी घेतला.व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करणारे शिंदे कोण?

लाडकी बहिण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे पहिल्या हफ्त्यात जमा झाले आहेत. पहिल्या टप्प्यात दोन महिन्याचे पैसे एकदम जमा झाले आहेत. त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे तिसरा हफ्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. सप्टेबर महिना संपत आला तरी हे पैसे जामा झाले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत होत्या. दिड हजार कधी मिळणार याची त्यांना प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा संपली असून 29 सप्टेबरला हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.  

Advertisement