सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री ऐवढचं काय तर पदाधिकारी, कार्यकर्ते ही अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या घटना घडल्या आहे. त्यांच्या व्हिडीओ ही व्हायरल झाले आहेत. यावर विरोधकांनी टीकाही केली होती. पण अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाही. अधिकाऱ्याला थेट सर्वां समोर झापण्याचं काम भाजप आमदाराने केलं आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लातूर जिल्ह्यातील आहे.
रमेश कराड हे भाजपचे आमदार आहेत. ते लातूर ग्रामीणचे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांचा पराभव केला होता. रमेश कराज यांनी आपल्या मतदार संघात नागरिकांचे प्रश्न सुटावेत यासाठी जनता दरबार आयोजित केला होता. यात अनेक नागरिकांनी आपले प्रश्न सुटत नाहीत असा तक्रारीचा सुर लावला होता. त्यामुळे आमदार साहेबांचा पारा चढला. त्यांनी थेट तिथं असलेल्या मंडळ अधिकाऱ्याला बोलवून घेतलं.
नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप
त्याच्यावर त्यांनी सर्व राग काढला. तू काय काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का? तू नागरिकांचे प्रश्न का सोडवत नाही. नीट नोकरी करायची आहे की नाही? लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात त्यांनी या अधिकाऱ्याला सर्वां समोर झापला.तो अधिकारी आपण कुणाचाही कार्यकर्ता नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण आमदार साहेब त्याचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
नक्की वाचा - Mumbai News: श्रीमंत महापालिकेची शाळा 1 महिन्यापासून बंद, 2 हजार विद्यार्थी वाऱ्यावर
त्याच वेळी हा प्रसंग कुणी तरी चित्रीत केला. त्याचा व्हिडीओ आता सगळीकडे व्हायरल होत आहे. सत्ताधारी आमदार मंत्री यांचे असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. त्यात आता भाजपचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या व्हिडिओची ही भर पडली आहे. त्यांनी भरवलेल्या जनता दरबारातील हा व्हिडिओ आहे. त्यात ते अधिकाऱ्याला झापताना दिसत आहे. शिवाय तो काँग्रेसचा असल्याचा आरोप ही त्याच्यावर करत आहेत. या व्हिडीओची चांगलीच चर्चा सध्या मतदार संघात रंगली आहे.