विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या जागा वाटपात कोणाली किती जागा मिळणार याबाबत अनेक तर्क लावले जात आहे. अशा वेळी एनडीटीव्ही मराठीच्या हाती महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला लागला आहे. त्यानुसार 288 पैकी कोणाच्या वाट्याला किती जागा आल्या आहेत हे समोर आले आहे. शिवाय या जागा वाटपावरून आघाडीत मोठा भाऊ कोण हे ही स्पष्ट झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला दणका दिला होता. त्यानंतर आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारीही जोरात सुरू केली आहे. आघाडीने जागा वाटप तातडीने पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळणार आहे.शिवाय जास्तीत जास्त लोकां पर्यंतही पोहोचता येणार आहे. त्यानुसार आघाडीने आपले जागा पाटप पूर्ण केल्याचे समोर येत आहे. त्यानुसार आघाडीचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. याची खात्रीशीर माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे.
ट्रेंडिंग बातमी - युद्ध पेटणार! इस्रायलच्या भीतीने इराणमध्ये नागरिकांच्या पेट्रोल पंपांवर लांब रांगा
जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेसने बाजी मारली आहे. 288 पैकी काँग्रेसच्या वाट्याला 105 जागा आल्याचे समोर येत आहे. त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 95 जागा मिळत आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदरात 85 जागा पडल्या आहेत. साधारण: हेच अंतिम जागा वाटप असेल अशी सुत्रांची माहिती आहे. यातील अजूनही काही जागांची आदलाबदली होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी चर्चा सुरू असल्याचेही समजते.
काँग्रेस विदर्भातील जास्तीत जास्त जागा लढणार असल्याचेही समोर येत आहे. विदर्भातील जवळपास 40 जागा लढावणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र काही जागांवर चर्चा अजूनही अडली आहे. शिवसेना ठाकरे गटानेही काही जागांवर यात दावा केला आहे. हा तिढा लवकरच सोडवला जाईल. विभागानुसार सध्या मविआमध्ये चर्चा सुरू आहे. नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात आघाडीची पहिली यादी जाहीर करण्याचा मानस आहे.
ट्रेंडिंग बातमी - गौतमी पाटीलच्या मनात कोणी केलं घर? थेट उत्तर देत चाहत्यांना केलं...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे आघाडी विधानसभेतही विजय मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे महायुतीची नाकेबंदी करण्याची रणनिती आघाडीने आखली आहे. लवकरात लवकर जागा वाटप करून प्रचार सुरू करण्याची रणनिती आघाडीची आहे. लोकसभेला 48 पैकी 31 जागा आघाडीने जिंकल्या होत्या. आता विधानसभेतही महायुतीला धक्का देण्यासाठी आघाडी सज्ज झाली आहे.