संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी विरोधात जोरादार आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर ते मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना लक्ष करत असताना दिसत आहेत. आता त्यांनी आणखी एक प्रकरण बाहेर काढले आहे. हे प्रकरण साधेसुधे नसून तब्बल 9 अब्ज रुपयांचे आहे. विशेष म्हणजे हे नऊ अब्ज रुपयांचे व्यवहार एकाच व्यक्तीच्या नावाने झालेले आहे. धस यांनी केलेल्या या आरोपांमुळे संपुर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महादेव अॅपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. टेंबुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावाने 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचे धस यांनी सांगितलं. या एकाच व्यक्तीच्या नावाने येवढ्या मोठ्या रक्कमेचे व्यवहार कसे झाले असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्या मागे कोण आहे असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणात ईडी का नाही असं ही ते म्हणाले. शिवाय बाबत जे कोणी तपास करत होते, ते निष्क्रिय आहेत. त्यांनी यातील आरोपींनाच जामीन मिळवून दिला असा आरोपही धस यांनी केला आहे. याबाबतची तक्रार आपण केल्याचेही ते म्हणाले. बीड पोलिस दलात कोण कोण आहे याची यादीही आपण मागितली असल्याचे ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल
या शिवाय आता परळीतही नवा पॅटर्न सुरू झाला आहे. त्यात गायरान जमिनी आका आणि त्यांचे चेलेचपाटे हडपत आहेत. तर काही गायरान जमीनी वरुन बंजारा आणि पारधी समाजाच्या लोकांना हुसकावून लावले जात आहे. हा नवा परळी पॅटर्न आता सर्व जण पाहात आहेत असा आरोही त्यांनी केला. या मागे कोण आहे हे पोलिसांनी शोधले पाहीजे असंही ते म्हणाले. शिवाय शेकडो एकर जमिनी गेल्या पाच वर्षात कुणी घेतल्या. त्यांच्याच जमिनीमध्ये बंधारे कसे बांधले गेल असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. गँग ऑफ वासेपूर उभे करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे असंही ते म्हणाले.
परळीत आणखी एक पॅटर्न पाहायला मिळत आहे, तो म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटीक्स. त्याचं सर्वांनीच शिक्षण घेण्यासाठी परळीत यायला पाहीजे असा टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर संपुर्ण देशात हा पॅटर्न राबवला पाहीजे असंही ते मिश्किल पणे म्हणाले. सध्या आम्ही हा पॅटर्न परळीत पाहात आहोत. कधी रश्मीका मनधना, तर कधी सपना चौधरी आम्ही या इव्हेंटमध्ये आल्याचं आम्ही पाहीलं. प्राजक्ता माळीही येत असतात असंही धस यावेळी म्हणाले. त्यामुळे हे सर्व काही पाहायचं असेल तर परळीत या असंही मिश्किल पणे सांगायला ते विसरले नाहीत.
विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सध्या वाळू माफिया टरकले आहेत. पण राख माफिया कधी टरकणार असा प्रश्न त्यांनी केला आहे. राखेच्या गाड्यांकडून हाफ्ते सुरू आहेत. ही वसूली कुणाकडून होत आहे असा प्रश्नही त्यांनी केला. तो आका कोण हे शोधले पाहीजे. सध्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदाची स्वप्न पडत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे विमान खाली आणावे असा सल्लाही धस यांनी यावेळी दिला.