दहावी पास मिलिंद नार्वेकर आहेत कोट्यधीश, ठाकरेंच्या विश्वासूची एकूण संपत्ती उघड

Milind Narvekar property: मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती उघड झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

Milind Narvekar property:  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव म्हणून नार्वेकरांनी आजवर काम केलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना नार्वेकरांवर जोरदार हल्ला केला होता. त्यावेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. राणेंप्रमाणेच शिवसेना सोडलेल्या अन्य काही नेत्यांनीही नार्वेकरांना लक्ष्य केलं होतं.

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी नार्वेकरांची ओळख आहे.  आजवर नेहमी पडद्याच्यामागेच असलेल्या नार्वेकरांबद्दल सर्वसामान्यांमध्ये नेहमीच उत्सुकता आहे. वेगवेगळ्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांची तिकीटं निश्चित करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असे. या निवडणुकीत नार्वेकर स्वत: उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. 

Advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार  मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती उघड झाली आहे. दहावी पास असलेल्या नार्वेकर कोट्यावधींची संपत्ती आहे, असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलंय.

Advertisement

( Video : 'आपण परत यायलाच पाहिजे' संजय राऊत, चंद्रकांत पाटलांना काय म्हणाले? )
 

नार्वेकरांच्या प्रतिज्ञापत्रात काय?

शिक्षण - दहावी पास
गुन्हा - एकाही गुन्ह्याची नोंद नाही
बँक खात्यामधील रक्कम - 74 लाख 13 हजार रुपये
पत्नीच्या खात्यातील रक्कम - 8 कोटी 22 लाख 118 रुपये
बॉण्ड्स किंवा म्युचअल फंडातील रक्कम - 50 हजार रुपये
पत्नीकडील रक्कम - 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये
इतर पॉलिसीमधील गुंतवणूक - 3 लाख 68 हजार 729 रुपये
पत्नीची गुंतवणूक - 67 लाख 88 हजार 558 रुपये
वैयक्तिक कर्ज - 26 लाख 38 हजार 160 रुपये
पत्नीवरील कर्ज - 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये
बँकेचे लोन - 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 रुपये
वाहन - कोणतंही नाही
स्वत:कडील सर्व दागिन्यांची किंमत - 71 लाख 28 हजार 189 रुपये
पत्नीकडील सर्व दागिन्यांची किंमत - 67 लाख 61 हजार 420 रुपये
जमीन - रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुडमध्ये 74.80 एकर जमीन
घर - मालाड आणि बोरिवलीमध्ये 1000 स्क्वेअर फुटांचं घर
फार्महाऊस - अलिबागमध्ये पत्नीच्या नावावर फार्महाऊस
उत्पन्नाचं साधन - वैयक्तिक पगार, घराचं भाडं, व्यावसायिक मिळकत, विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी

Advertisement