महायुतीत आता रत्नागिरीत वाद, शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेता भिडला, थेट सुनावले

भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. राज्यातले सरकारहे भाजप शिवसेनेचे आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात माने यांनी सामंत यांना सुनावले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

महायुतीत भाजप आण शिवसेना शिंदे गट यांच्यातील कोकणातला वाद काही मिटण्याचे नाव घेत नाही. दापोलीत आधी शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण हे एकमेकांना भिडले. हा वाद सुरूच असताना आता रत्नागिरीत ही भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केलं आहे. राज्यातले सरकारहे भाजप शिवसेनेचे आहे हे लक्षात ठेवा अशा शब्दात माने यांनी सामंत यांना सुनावले आहे. रत्नागिरीत नुकताच लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाकडे भाजप कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती. त्या पार्श्वभूमिवर ते बोलत होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमाकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. या कार्यक्रमाला भाजपच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते असा आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे. आपण माजी आमदार आहोत. त्यामुळे प्रशासनाने आपल्याला निमंत्रण देणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही.  

ट्रेंडिंग बातमी -  'बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत'

 हे सर्व प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. उदय सामंत यांच्या दबावामुळे निमंत्रण दिलं नसावं असेही ते म्हणाले. ऐवढेच नाही तर उदय सामंत यांना कधी संपर्क साधला तर ते फोन उचलत नाहीत असा आरोपही माने यांनी केला. उदय सामंत यांना वाटत असेल की हे सरकार त्यांचंच आहे. पण हे सरकार महायुतीचे आहे. त्यात भाजपही आहे याची आठवण माने यांनी करून दिली. महायुतीचा धर्म उदय सामंत यांनी पाळला पाहीजे असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील शाळांना चाप, सरकारकडून 6 महत्त्वाचे आदेश जारी 

गेल्या दोन वर्षात उदय सामंत मनमर्जी करत आहेत. मी म्हणेन ते धोरण आणि बांधेन ते तोरण असं उदय सामंत वागत आहेत, असा आरोपही माने यांनी केला. भविष्यात यात सुधारणा झाली पाहीजे असं आपल्याला वाटतं. प्रशासनाला वेठीस धरून गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम होत आहेत. सरकार म्हणून समन्वयाने काम केलं पाहिजे. सगळं मी केलं, असा जाणीवपूर्वक खटाटोप उदय सामंत यांचा सुरू आहे असंही माने म्हणाले. अशा स्थितीत सामंत यांनी भान ठेवणे गरजेचे असल्याचे माने म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?

उदय सामंत आणि बाळ माने हे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. बाळ माने यांचाच पराभव करून  सामंत हे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले होते. त्यानंतर कधीही पराभवाचे तोंड सामंत यांनी पाहीले नाही. सलग चार वेळा ते रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. दोन वेळा ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लढले तर दोन वेळा त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. कोणताही पक्ष असला तरी विजय मात्र सामंत यांचाच झाला होता.  

Advertisement