विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर जवळपास दहा दिवसानंतर राज्याला नवं सरकार मिळणार आहे. महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं. आतापर्यंतचं सर्वात मोठं बहुमत महायुतीला मिळालं. आता गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता महायुतीचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीची जय्यत तयारी केली जात आहे. हा शपथविधी खास व्हावा यासाठी लक्ष दिलं जात आहे. म्हणूनच शपथविधी वेळी शपथ घेणाऱ्या नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी तयार केली जात आहे. पुण्यात हा पगड्या तयार होत असून जे नेते शपथ घेतील ते या पगड्या घालणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे शपथ घेणार की त्यांच्या पक्षाचे अन्य नेते शपथ घेणार हे अजून स्पष्ट नाही. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानात होणार आहे. हा शपथविधी सर्वांच्याच लक्षात रहावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधानांपासून अगदी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. शिवाय एनडीएच्या मुख्यमंत्र्यांनाही बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य असाच होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस- पवारांचं ठरलं, एकनाथ शिंदेंचे मात्र तळ्यात-मळ्यात
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे खास जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शपथविधीसाठी तुकाराम पगड्या तयार केल्या आहेत. शपथ घेणाऱ्या नेत्यांबरोबरच प्रमुख नेत्यांना या पगड्या दिल्या जाणार आहेत. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी बनविण्यात आली आहे. शपथविधीसाठी या पगड्या पाठवण्यात येणार आहेत. शपथविधीत या पगड्या आकर्षचाचे केंद्र ठरणार आहेत.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर अजित पवार हे शपथ घेणार हे स्पष्ट आहे. मात्र एकनाथ शिंदेंचा अजून निर्णय झालेला नाही. शिवाय मंत्र्यांचा शपथविधी होणार की नाही हे पण स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत अनेक नेते हे मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही नेत्यांना मंत्रिपद देताना काटकसर करावी लागणार आहे हे निश्चित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world