प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
Jayant Patil on Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. 1995 मधील एका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. नाशिकमधील कोर्टानं या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पण, त्यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांची मागणी आहे. माणिकरावांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आग्रही असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जयंत पाटील काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे मंत्री झाल्यावरच ती केस वर येणे आणि माणिकरावांच्या विरोधात निकाल जाणे, त्यांना मंत्रिपद सोडण्याच्या जवळ आणणं हे सगळं कुणीतरी रचतंय, करतंय अशी अशी शंका आता लोकांना वाटायला लागली आहे. त्यांच्या चूकीचं समर्थन करणार नाही मात्र वीस बावीस वर्षांनी सत्तेत बसल्यावर निकाल येणं म्हणजे हे निकाल आपोआप लागतायत ? की कुणीतरी गोळा करून ते निकाल आणण्याची व्यवस्था करतोय ? असा सवाल जयंत पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.
अलिकडच्या काळात कोणताही गुन्हा मान्य करायचा नाही, असं सरकार चालवणाऱ्या अनेकांची भूमिका दिसते. माणिकराव मंत्री आमदार नसताना आधी कधी केस आम्हालाही फारशी माहित नव्हती. - कोर्टाने निर्णय दिला, त्यामुळे पुढे बघू काय होतं, असं पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील यांनी नेमका कुणाकडं इशारा केला आहे, याची चर्चा आता सुरु झाली आहे.
( नक्की वाचा : जयंत पाटील भाजपात जाणार? बावनकुळेंच्या भेटीवर केला खुलासा, म्हणाले... )
शिक्षेला तात्पुरती स्थगिती
राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज करुन लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात माणिकराव कोकाटे यांनी आव्हान दिले होते, त्या प्रकरणात नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.