
समाधान कांबळे, प्रतिनिधी
Jayant Patil meet Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. स्वत: जयंत पाटील यांनीच या भेटीची माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी (24 फेब्रुवारी, 2025) संध्याकाळी भेट झाली. भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते. मुंबईतील बावनकुळे यांच्या घरी ही भेट झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पाटील?
जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच पाटील यांनी बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्यानं या चर्चेला उधाण आलं होतं. पण, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Neelam Gorhe : 'मांडवलीसाठी नीलम गोऱ्हेंनी 25 लाख मागितले', 'या' आमदाराचा खळबळजनक आरोप )
सांगली जिल्ह्यातल्या महसूल प्रशासनावर 10 ते 12 निवेदनं दिली. त्याबाबत निवेदन देण्यासाठी भेट मागितली होती. महसूल विभागात सातबारा ऑनलाईन केले आहेत. संगणकीकरण झाल्यानंतर त्यामधील अनेक शेतकऱ्यांचा दुरुस्त्या होत नाहीत. हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहे. त्याचबरोबर अनेक जमिनी अधिग्रहित होणार आहेत, असं शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्या जमिनी अधिग्रहित झालेल्या नाहीत. तसंच त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. आमच्या जिल्ह्यातल्या या प्रश्नावर त्यांच्याशी भेटलो, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.
या भेटीच्या कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही दिलेल्या निवेदनाचा रेकॉर्ड तुम्ही बघा असंही पाटील यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world