मुंडे- जरांगेंच्या दसरा मेळाव्याने वातावरण तापणार? गर्दीचा उच्चांक कोण मोडणार?

जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यातून पोलिसांचा मोठा फौज फाटा मागविण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

बीड जिल्ह्यात होत पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे हे दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे इथलं राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे. या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यातून पोलिसांचा मोठा फौज फाटा मागविण्यात आला आहे. नारायणगड आणि सावरगाव घाट यासह प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दोन्ही मेळाव्यात गर्दीचा उच्चांक होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यातून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मेळाव्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त 

या दोन्ही मेळाव्यासाठी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी 2 अपर पोलिस अधीक्षक, त्यांच्या जोडीला दोन पोलिस उपअधीक्षक असणार आहे. शिवाय 15 पोलिस निरीक्षक,  सहायक निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक 60 जण तैनात असणार आहेत. तर जवळपास 700 पुरुष पोलिस कर्मचारी तैनात असतील. त्यांच्या जोडीला 100 महिला पोलिस असणार आहेत. शहर वाहतूक शाखा आणि बाहेर जिल्ह्यातून आलेले पोलिस कर्मचारी 100 आहेत. तर 300 होमगार्ड त्यांच्या बरोबर असतील. महामार्ग सुरक्षा पथक अधिकारी,कर्मचारी ही इथे तैनात असतील. त्याच बरोबर 9 दंगल पथक ही हजर असतील. राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या ही तिथे आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  Dasara Melava 2024 : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार?

पंकजा मुंडे शक्तीप्रदर्शन करणार 

भगवान गडावर पंकजा मुंडे दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याला प्रतिम मुंडे, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, सुजय विखे पाटील, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. हा मेळावा दुपारी बारा वाजता सुरू होईल. मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. जवळपास 100 बाय 100 फुटाचे हे व्यासपीठ आहे. सभे स्थळापासून 150 मिटर अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. शिवाय सभेला येणाऱ्या गाड्यांसाठी जवळपास 260 एकरवर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर 40 एकरवर दसरा मेळावा होणार आहे. भगवान भक्तीगडावर 500 स्वयंसेवक तैनात असतील. हेलिपॅडपासून मेळाव्यापर्यंत पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शिवाय 25 फुटांच्या हाराने पंकजा मुंडे यांचे स्वागत केले जाईल. सभेला येणाऱ्यांसाठी सावरगावघाट ग्रामस्थांच्या वतीने पिठलं-भाकरीचे जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE : ठाकरे, शिंदे, मुंडे, जरांगेंच्या दसरा मेळाव्याने वातावरण तापणार

मनोज जरांगे पाटील काय बोलणार? 

एकीकडे पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर दसरा मेळावा होत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळाव जवळच असलेल्या नारायण गडावर होणार आहे. हा मेळावाही दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे. मेळाव्यासाठी भव्य व्यासपीठ उभारले आहे. बाराच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील इथे पोहोचतील. या सभेला येणाऱ्या गाड्यांसाठी 200 एकर वर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तर 100 एकरावर सभा होणार आहे. नारायणगडावर जवळपास 5 हजार स्वयंसेवक असणार आहेत. सभे स्थळापर्यंत जरांगेंची मिरवणूक काढली जाणार आहे. त्यावेळी 51 जेसीबीद्वारे फुलांची उधळण केली जाईल. दरम्यान इथं येणाऱ्यांसाठी 500 क्विंटल बुंदी, पाण्याचे 51 टँकर राहणार आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राणा पती-पत्नीत जागा वाटपावरून मतभेद? रवी राणांच्या जागांवर नवनीत यांचा डोळा

मुंडे- जरांगे काय बोलणार? 

पंकजा मुंडे या दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. या पराभवा बाबत त्या काय बोलता याकडे ही आता लक्ष लागले आहे. तर मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभेसाठी काय भूमीका घेणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे मराठवाड्यात होत असलेल्या या दोन्ही मेळाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.