ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण देऊ नये ही मागणी करणाऱ्या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर बोलताना छगन भुजबळ यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, "मराठा समाजाला 'सरसकट ओबीसी' अशी मागणी मान्य करता येणार नाही. ती कायद्यातही बसणार नाही', असं स्पष्ट केलं. भुजबळांच्या या वक्तव्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जरांगे काय म्हणाले?
'भुजबळ काहीही रद्द करा म्हणतील, सगेसोयरे रद्द करा म्हणत असतील तर हा जातीवाद नाही का? मराठा समाजाला विरोध करण्याचा त्यांचा धंदा आहे. मी अनेक दिवसांपासून आदरच करत आहे. मी तुमचा सन्मान करत आहे. आम्ही देखील बैठकीत बसण्यासाठी तयार आहोत, असं जरांगे यांनी जाहीर केलं.
मराठा कुणबी एक आहे कसे सिद्ध करायचे? तुम्ही तुमचं म्हणणं कसं सिद्ध करणार? आमच्या आंदोलनानंतर नोंदी निघाल्या आहेत. आम्ही सिद्ध करतो, असं जरांगे यांनी सांगितलं. त्याचवेळी आजची बैठक मॅनेज बैठक होती. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी बैठक होती. सरकार आणि त्यांची मॅनेज बैठक होती, असा आरोप जरांगे यांनी केला.
( नक्की वाचा : 'सगेसोयरे आदेश रद्द करा' OBC शिष्टमंडळानं सरकारकडं कोणत्या मागण्या केल्या? )
मराठा समाजाला आरक्षण देऊ नयेत म्हणतात, आम्ही काय करावे.. यांचे विद्रोही विचार आहे. तुमची मागणी काय आहे हेच कळत नाही. मराठा समाजाविरोधात टोळकी जमा झाली आहे. सरकारमधील मंत्र्यांनी मॅनेज बैठक केली आहे, असा दावा जरांगे यांनी केला.
पंकजा मुंडेंना उत्तर
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या ट्विटलाही जरांगे यांनी यावेळी उत्तर दिलं. त्यांचे विचार चांगले आहेत. संसदेत बसून त्यांनी मराठा आरक्षण बाबत चांगले मुद्दे मांडले. आमचे हात पाय तोडण्याची भाषा केली जात होती. त्यांना जे मिळालं त्या आम्हाला द्या अशी पोटदुखी का आहे ?आंदोलन काय चालत आहे हे कळत नाही. हे काय भांडण आहे ? भुजबळ काहीही शिकवतो आणि हे बोलतात, असा टोला जरांगे यांनी लगावला. मी सरकारसोबत असतो तर एवढं बोललो असतो का? मी सरकारचा किंवा विरोधकांचा कुणाचाही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.