ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके याांना मी विरोधक मानत नाही. छगन भुजबळ हे खरे विरोधक आहेत, असं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. ओबीसी आंदोलनाला सर्व रसद भुजबळच पुरवत आहेत. त्यांची राजकीय करियर उद्धवस्त केलं नाही तर नाव बदलेल, असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. 13 तारखेपर्यंत काय निर्णय घेणार ते पाहतो. अन्यथा मराठा समाजाचे राज का आहे ते दाखवतो, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. जरांगे पाटील यांना आज डिस्चार्ज मिळाला होता. मात्र त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या दरम्यान पत्रकारांशी जरांगे बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा नोंदी रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ अनेक दिवसांपासून करत आहेत. त्यांना मंडल आयोगानं दिलेलं आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यांनी टोळी तयार केलीय. तुम्ही 16 टक्के आरक्षण कसं घेतलं हे दाखवतो. मराठा नेत्यांनी भाकरी खाणं रद्द करावं. आता तरी जागं व्हावं. हक्काच्या नोंदी सापडल्या तरी ते रद्द करा असं म्हणतात, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली. सर्व ओबीसी नेत्यांनी यावे मला काही देणंघेणं नाही, पण नोंदी रद्द करा म्हणणे चालणार नाही. तुमचा देव आला तरी रद्द होत नाही. बोगस आरक्षण रद्द करा, असंही जरांगे यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
मला ओबीसींचं वाटोळं करायचं नाही. मंडल आयोग रद्द होते. त्याला आव्हान देखील देण्यात आले होते. जातीयवाद कसा दिसतो हे ओबीसी नेत्यांमध्ये पाहायला मिळतंय. मराठा समाजाबद्दल त्यांची नियत दिसली, असं सांगत जरांगे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. पण तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून मराठ्यांवर अन्याय करणार आहात, अशी टीका जरांगे यांनी केली.
( नक्की वाचा : ओबीसी आंदोलन पेटलं; बीडमध्ये महिलांची रस्त्यावर उतरून जाळपोळ )
ओबीसी आंदोलनाला सर्व भुजबळच पुरवत आहेत. ओबीसी आंदोलन त्यांनीच उभं केलंय. मी हाकेंना दोष देत नाही. त्यांच्या पाठीमागे भुजबळच आहेत. तुमचं राजकीय करियर उद्धवस्त केलं नाही तर नाव बदलेन, असं आव्हान जरांगे यांनी दिलं. जातीयवाद करुन दंगल करण्याचा येवलावाल्याचा प्लॅन आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला