मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. आरक्ष मिळावं यासाठी ते मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत. त्यासाठी तयारीही जोरदार सुरू आहे. गावागावात मराठा समाजाच्या लोकांच्या बैठका सुरू आहेत. पुर्वी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची अंमलबजावणी व्हावी अशी प्रमुख मागणी आहे. शिवाय मराठा समाजाचा ओबीसीत समावेश व्हावा यावर जरांगे पाटील यांचा जोर आहे. त्यासाठीच त्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे.
ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येकी 500 रूपये प्रमाणे वर्गणी गोळा केली आहे. शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान तीन चार वाहने काढण्याची तयारी केली आहे. येत्या 27 तारखेला मराठा तरूण गावागावातून बाहेर पडणार आहेत. त्यानंतर आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईच्या दिशेने जातील. अशी रणनिती आखण्यात आली आहे.
Bhiwandi News : खड्ड्यामुळे डॉक्टरचा हकनाक बळी; चूक कोणाची? स्थानिकांचा संतप्त सवाल
तर शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाचे दर्शन घेवून मनोज जरांगे पाटील आपली कुच मुंबईच्या दिशेने करतील. आंदोलक गणपतीची मुर्ती ट्रकवर ठेवणार आहेत. हीच मुर्ती मुंबईतल्या समुद्रात पुढे विसर्जित केली जाणार आहे. आंदोलकांनी मुंबईला निघताना सोबत किराणा घेतला आहेत. स्वंयपाकी ही बरोबर असतील. किमान पंधरा दिवस आंदोलन करण्याची तयारी आहे. यावेळी कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही अशी भूमीका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.