'गावा-गावातल्या लढाया बघत बसणार आहात का?' भुजबळांचा पवारांवर पलटवार

गावा-गावात होणाऱ्या लढाया तुम्ही बघत बसणार आहात का? अशा थेट सवाल करत भुजबळांनी पवारांना सुनावलं आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
नाशिक:

मराठा- ओबीसी वाद राज्यात पेटला आहे. यावर तोडगा काढावा यासाठी शरद पवारांनी पुढे आलं पाहीजे अशी भूमीका छगन भुजबळ यांनी मांडली होती. त्यानंतर त्यांनी पवारांची भेट ही घेतली होती. त्या भेटी त्यांनी आपण पुढाकार घेवून मार्ग काढण्यास मदत केली पाहीजे असे आवर्जून सांगितले. मात्र पवारांनी यावर गुगली टाकत मनोज जरांगेंना सरकारने काय आश्वासन दिले आहे, हे जाहीर करावे असे सांगतले. शिवाय ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनाही सरकारने काय हमी दिली आहे हे समोर आले पाहीजे असेही पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी पलटवार केला आहे. शिवाय शरद पवारांनी आता काय केले पाहीजे हे ही त्यांनी सांगितले आहे.  

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भुजबळांनी पवारांना काय सुनावलं

मराठा आणि ओबीसी प्रश्नी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी सरकारने शरद पवारांना विश्वासात घेतले नसेल. या पवारांच्या आरोपात तथ्यही असेल असे छगन भुजबळ म्हणाले. पण तसे असले तरीही शरद पवार हे राज्याचे जेष्ठ नेते आहेत. राज्यात अशी स्फोटक स्थिती असताना त्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. ते ही स्थिती उघड्या डोळ्यानी पाहू शकत नाही. असे सांगत असताना गावा-गावात होणाऱ्या लढाया तुम्ही बघत बसणार आहात का? अशा थेट सवाल करत भुजबळांनी पवारांना सुनावलं आहे. त्यामुळे सरकार विश्वासात घेतं की नाही या पेक्षा तुमचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे पुढाकार घेवून यातून मार्ग पवारांनी काढला पाहीजे असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण

पवार मार्ग काढण्यात हुशार 

शरद पवारांनी या आधीही महाराष्ट्र निर्माण झालेल्या संकटावर मार्ग काढले आहेत असे भुजबळ म्हणाले. मराठावाडा नामांतर लढ्यावेळी राज्यात अशीच स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. हाणामाऱ्या आणि वादविवाद होत होते. पण त्यावेळी शरद पवारांनी मार्ग हा काढलाच होता असे भुजबळ म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या टोकाचे मतभेद होते. पण महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर हे दोन्ही नेते एकत्र येत होते हे राज्याने पाहीले आहे. आताही शरद पवार मोदी आणि शहांवर टिका करतात. पण शेती आणि सहकाराबाबतच्या चर्चा करण्यासाठी हे नेते एकत्र असतात असेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे मराठा ओबीसी वादावर पवार नक्कीच तोडगा काढतील असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांना घरात जागा, पण पक्षात... शरद पवारांचं सूचक वक्तव्य

आश्वासनावर काय म्हणाले भुजबळ 

जरांगे आणि हाकेंना सरकारने काय आश्वासन दिले आहे हे जाहीर करावे अशी मागणी पवारांनी केली आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की हाकेंनी उपोषण सोडतांना त्यांना काय आश्वासन दिले आहे हे आपण पवारांना सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.  तर जरांगेंना भेटायला मुख्यमंत्री गेले होते. त्यांनी जरांगेंना काय आश्वासन दिलं माहित नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना आपण सांगू असे भुजबळांनी पवारांना सांगितले. दरम्यान पवार या प्रकरणात लक्ष घालतील आणि नक्कीच तोडगा सुचवतील असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  सर्व पक्षीय बैठकीला का गेलो नाही? शरद पवारांनी गुगली टाकली, सत्ताधारी क्लिनबोल्ड होणार?

शरद पवारांची भूमीका काय? 

शरद पवारांनी आता काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे सरकारच एक प्रकारे पवारांच्या गुगलीत गुरफटून जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पवारांनी सरकारलाच आता प्रश्न उपस्थित केला आहे. की मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही काय आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणा बाबत तुम्ही त्यांना कोणती कमिटमेंट केली आहे. त्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले. त्यांच्या या प्रश्नामुळे आता सरकारचीच कोंडी होणार आहे. शिवाय ओबीसी समाजालाही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिले त्यामुळे त्यांनीही उपोषण मागे घेतले हे समजले पाहीजे अशी पवारांची मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाला या आधी झालेल्या चर्चांमध्ये सरकारने काय आश्वासने दिली आहेत हे सरकारला सांगावे लागेल. त्यामुळे सरकारचीच एक प्रकारे कोंडी होणार आहे अशी चर्चा झाली आहे. शिवाय पवारांनी टाकलेल्या गुगलीत सरकारचा क्लिनबोल्ड होतो की काय असेही बोलले जात आहे.