महाविकास आघाडीत एमआयएमला सोबत घेण्यासाठी इम्तियाज जलील यांनी आघाडीतील दोन प्रमुख पक्षाला लेखी प्रस्ताव पाठवला आहे. यात काँग्रेस आणि शरद पवार गटाचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक आणि दोन ऑक्टोबर रोजी देखील जलील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली आहे असे जलील यांनी सांगितले आहे. शिवाय जलील यांनी 28 मतदारसंघाची यादी तयार केली आहे. या जागा एमआयएमला मिळाव्यात अशी मागणी त्यांनी मविआला केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
जलील यांनी आपल महाविकास आघाडीत जाण्यास तयार आहोत असे सांगितले आहे. त्याबाबत आपल्याला लेखी प्रस्ताव देण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानुसार हा लेखी प्रस्ताव काँग्रेसा आणि शरद पवारांना दिल्याचा दावा जलील यांनी केला आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जर महाविकास आघाडीत आमचा समावेश झाला तर आपल्याला 28 मतदार संघ मिळालीत अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. या 28 मतदारसंघाची यादी ही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...
जरी या 28 जागांची यादी दिली असली तरी गरज पडल्यास काही जागांवर तडजोड करण्याची तयारी एमआयएमची आहे असेही जलील यांनी स्पष्ट केले आहे. ज्या जागांवर एमआयएमने दावा केला आहे त्या सर्व जागा या मुस्लिम बहुल आहेत. यातील बरेचसे मतदार संघ हे आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शिवाय तिथे त्यांचे विद्यमान आमदारही आहेत. असे असतानाही एमाआयएमने या जागांवर दावा केला आहे.
त्यात पुणे कॅन्टोन्मेंट, सोलापूर सेंट्रल,अकोट,बालापुर,अकोला पश्चिम,वाशिम ,अमरावती,नांदेड नॉर्थ,नांदेड एस, औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, धुळे शहर, मालेगाव मध्य या मतदार संघावर दावा केला आहे. शिवाय मुंबई ठाण्यातल्या 15 जागांवर दावा केला आहे. यातील 12 जागांवर विजय मिळवता येईल असेही जलील म्हणाले आहेत.