जाहिरात

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...

पुण्यातील घोडेगावमध्ये तर थेट शिक्षकानेचं सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करत विनयभंग केलाय.

शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...
पुणे:

शाळेतील विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुण्यातील घोडेगावमध्ये तर थेट शिक्षकानेचं सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग करत विनयभंग केलाय. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर हा शिक्षक फरार झाला आहे. त्याचा घोडेगाव पोलीस शोध घेत आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसापासून महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. बारामतीतल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर शाळेतल्या दोन चिमुकल्यांवरही अत्याचाराही बातमी समोर आली. शिवाय पुण्यातल्या बोपदेव घाटामध्ये 21 वर्षीय तरुणीवर गँगरेपची घटनाही घडली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

विद्यार्थ्यीनीचा पाठलाग करणाऱ्या शिक्षकाचे नाव राजेंद्र पानसरे असं आहे. तो क्रीडा शिक्षक आहे. तो घोडेगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेत क्रिडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित विद्यार्थिनी ही क्रिकेट खेळते. तिला राजेंद्र पानसरे प्रशिक्षण देतो. तिला महिला संघाचे कर्णधारपद देण्याचं आमिष पानसरेने दाखवले होते. त्यातून तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता, असा पिडीत तरूणीने आरोप केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बारामतीचे मैदान अजित पवारांनी सोडले? 'त्या' वक्तव्याने संभ्रम वाढला, नवा उमेदवार कोण?

तिच्याशी जवळीक साधण्याचा त्याचा प्रयत्न तर होताच. पण शाळा सुटल्यानंतरही ती घरी जात असताना तो तिचा पाठलाग करायचा. हे एकदा नाही तर वारंवार होत होते. शेवटी या त्रासाला ती तरूणी कंटाळली होती. तिने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला

गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण या शिक्षकाला लागली. त्यानंतर हा शिक्षक फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी पथकं ही तयार केली जात आहेत. या शिक्षकाने आणखी विद्यार्थिनींना असा त्रास दिलाय का याचा ही तपास केला जाणार आहे. त्याची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान पुण्यात गेल्या काही दिवसापासून अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.