नितेश राणे हे संधी मिळेल त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आता तर ते राज्याचे मंत्री झाले आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. चांगले लोकं सत्तेत आले, त्या त्या पदावर बसले की सगळी कामे व्यवस्थित सुरू होतात. त्याला पायगुण चांगला असावा लागतो. तत्कालीन चपट्या पायाच्या मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गातील चीप्पी विमानतळाचे उद्घाटन केलं. ते आता बंद पडत चाललं आहे. अशी टीका करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चीपी विमानतळाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या विमातळावर विमान वाहतूक सुरू ही झाली होती. मात्र त्यानंतर त्यात वारंवार अडथळे निर्माण झाले होते. या विमानतळावरून राजकारण ही झाले होते. ज्या वेळी या विमानतळाचे उद्धाटन झाले त्यावेळी कोरोनाचा काळ सुरू होता. आता हे विमानतळ बंद पडत चाललं असल्याचा आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या उद्घाटनाची पाटी कशी बदलता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं यावेळी राणे म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले आदर्श लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताची कामं करणं गरजेचं आहे. काम करताना कॉन्ट्रॅक्टरने वेळ काढू पणा केल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. ब्लॅक लिस्ट करण्यात आपली पीएचडी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. गेली दहा वर्षे विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांना जेरीस कसं आणायचं हे शिकलो आहे. त्यामुळे आता सत्तेत आहे.
आता कसलीही अडचण नाही. मस्ती करणाऱ्या लोकांना, ज्याला सरकारी पैसा स्वतःच्या बापाचा वाटतो, ही मानसिकता असलेल्या ठेकेदारांना बॅक लिस्ट करणार असल्याचे ते म्हणाले. शिवाय आता विकासाला प्राधान्य दिले जाईल असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी आपले बंधू आणि आमदार निलेश राणे यांचे ही कौतूक केले. मालवण मतदार संघातून दोन वेळा असा आमदार निवडून गेला ज्याला काय काम करावे, कुठे करावे, कसे करावे हे माहित नव्हेत. तरीही दोन वेळा तुम्ही त्याला निवडून दिलं. पण निलेश राणे यांनी आपल्या कामाची चुणूक काही दिवसातच दाखवल्याचं ते म्हणाले.