MNS News: 'मराठीचा आदर केला नाही तर फटके पडणारच', मीरारोडचा वाद चिघळणार?

यानंतर दुकानदार मराठीत बोलेल, मनसेचं काम असचं असतं असं ही त्या म्हणाल्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मीरारोड:

सुजाता द्विवेदी 

मराठी बोलता येत नाही म्हणून मीरारोड इथल्या जोधपूर स्वीट अँड स्नॅक्स दुकानाचे मालक बाबूलाल चौधरी यांना मनसैनिकांनी मारहाण केली होती. शिवाय मराठी बोलता यायलाच पाहीजे असं ही बजावण्यात आलं होतं. महाराष्ट्रात मराठीचा आदर झालाच पाहीजे असं ही सांगण्यात आलं. यावेळी या दुकानदाराला मनसैनिकांनी चांगलाच प्रसाद दिला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरलही झाला. त्यानंतर इथलं राजकीय वातावरण ही तापलं. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी जैन मारवाडी व्यापारी असा उल्लेख करत यात उडी घेतली. त्यानंतर मनसे आणखी आक्रमक झाली आहे. त्यांनी मराठी बोलला नाही तर फटके पडणारच अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याच दुकानात आजा मनसेच्या उपाध्यक्षा रेश्मा तपासे गेल्या होत्या. त्यांनी आपली भूमीका स्पष्ट केली. मराठी बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मराठीचा आदर केला नाही तर तो मार खाणारच. जे आदर करणार नाही ते मार खातील. मराठी आणि हिंदीत असा किती फरक आहे? असा प्रश्न ही त्यांनी केला. हिंदी ही मोगलांच्या व्यवहारातील भाषा होती. शिवाजी महाराजांनी मराठी भाषा पुनरुज्जीवीत केली, त्याला विरोध करताय? असा प्रश्न ही त्यांनी या व्यापाऱ्याला केला.  जे मराठीचा आदर करणार नाही, त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करू. असा दम ही त्यांनी भरला.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - MNS Rada: आधी समजवले, मग कानफटवले! मनसैनिकांनी मराठी न बोलणाऱ्या व्यापाऱ्याला फटकवले

महाराष्ट्रात येऊन राहणाऱ्यांनी हे ठरवावे की त्यांना आता मराठी बोलायचे की नाही? अनेक दशके जर ही माणसं इथे राहात असतील तर त्यांनी मराठी भाषा का शिकली नाही ? मुंबईत एक जागा अशी नाही, जिथे मराठी माणूस शांतपणे बसू शकत नाही. जे उद्धटपणे, अरेरावीची भाषा वापरतात ते मार खाणारच याचा पुन्हा त्यांनी उल्लेख केला. स्थानिक आमदारांचा ही त्यांनी समाचार घेतला. इथल्या आमदारांनी सदर घटनेनंतर पोस्ट केली. त्यात त्यांनी जात आड आणली असा आरोप त्यांनी केला.  दोन कानाखाली मारल्यानंतर रुग्णालयात कुणी जातो का ? यानंतर दुकानदार मराठीत बोलेल, मनसेचं काम असंच असतं असं ही त्या म्हणाल्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

या प्रकरणानंतर त्या दुकानाचा मालक असलेल्या बाबूलाल चौधरी याने आपली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी त्या दिवशी नक्की काय झालं हे सांगितलं. मनसेचा कार्यक्रम सुरू होता. त्यातले काही कार्यकर्ते दुकानात आले होते. ते माझ्याजवळ आले, दुकानातील एका कर्मचाऱ्याकडे पाण्याची बाटली मागितली. यावर त्याने 10 रुपयांची हवीय का, 20 रुपयांची असं हिंदीत विचारलं होतं. यावरून त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानातील सगळ्यांनी मराठीत बोललं पाहीजे असं म्हटलं. मराठीत बोलला नाही तर धंदा करू देणार नाही असा इशारा ही दिला असं ते म्हणाले. मी त्यावेळी स्नॅक्स काऊंटरच्या इथे उभा होतो. त्यांनी मला विचारलं तू कोण आहे, त्यांनी मला म्हटलं की ज्यांना मराठी येत नाही अशा लोकांना कामावर ठेवता? अशी विचारणा केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Narayan Rane: गोगावलें बाबतचा प्रश्न, नारायण राणेंचे उत्तर, विषयच संपवला

पण महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे. मराठी भाषेबद्दलही आमचा आक्षेप नाही. आम्ही त्याचा आदरही करतो. आम्ही राजस्थानवरून इथे व्यवसाय करण्यासाठी आलो आहे. मात्र त्यांचे टार्गेट वेगळे होते. त्यांनी मला विचारलं की महाराष्ट्रात कोणत्या भाषेत बोलले जाते. यावर मी म्हटले की वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकं बोलतात. यानंतर एकाने मला मारायला सुरुवात केली. अचानक हे सगळं झालं. मी त्यांना काहीही वाईट बोललो नाही. महाराष्ट्रात आता आम्ही धंदा करू शकतो का, अशी भीती वाटायला लागली आहे. असं ही ते यानंतर म्हणाले. दरम्यान मुंबईत राहायचे तर मराठीत बोलावे लागेल असं मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला अभिषेक गुप्ता सांगतो. तो ही मनसेचा कार्यकर्ता आहे.