Akola News: अकोल्यात भीम ज्योत कार्यक्रमात ‘बूट’ वाद; दोन आमदारांवर आरोप, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

या कार्यक्रमात एक वादग्रस्त बाब समोर आली आहे.हरीश पिंपळे आणि वसंत खंडेलवाल हे दोन्ही आमदार पायातील बूट न काढताच विचार मंचावर गेल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Bhim Jyot Event News Today

योगेश शिरसाट, प्रतिनिधी 

Akola Bhim Jyot Event Today : भीम ज्योतीच्या निमित्ताने अकोल्यात राजकीय वातावरण रंगलं आहे. दरम्यान,भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त “भारताची भीम ज्योत” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुपारी चार वाजता हॉटेल सिटी स्पोर्ट क्लब येथे पार पडलेल्या या संवाद मेळाव्यात भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारांचा प्रसार आणि सामाजिक समरसतेचा संदेश देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.तर दुसरीकडे,कार्यक्रमात विविध महापुरुषांच्या प्रतिमा लावून वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

कार्यक्रमात ‘बूट' वादामुळे राजकीय चर्चा, आमदारांवर टीका

दरम्यान,या कार्यक्रमात एक वादग्रस्त बाब समोर आली आहे.हरीश पिंपळे आणि वसंत खंडेलवाल हे दोन्ही आमदार पायातील बूट न काढताच विचार मंचावर गेल्याचे समोर आले आहे.या मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांचे फोटो होते.त्यामुळे या कृतीला काही संघटनांकडून महापुरुषांचा अवमान मानले जात आहे.या घटनेमुळे अकोल्यात राजकीय चर्चा रंगली असून सोशल मीडियावरही याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.हा प्रकार अनवधानाने घडला की जाणीवपूर्वक,यावरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> Solapur News: दारूचं प्रचंड व्यसन, एक दिवस भयंकर केलं, सख्ख्या बहिणीने पतीच्या मदतीने भावाला संपवलं

वंचित आघाडीचा संताप; भाजपकडून स्पष्टीकरण

या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडी ने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी भाजपच्या दोन्हीही आमदारांवर महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करत आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसतील,असा इशारा दिला.त्यांनी 1992 मधील बाबरी मशीद पाड प्रकरण संदर्भ देत भाजप आणि संघावर टीका केली.दुसरीकडे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी हा प्रकार मी बघितलाच नसल्याचा म्हटलं.

नक्की वाचा >> Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..

आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले.मात्र,दुसरीकडे दोन आमदारांना भीम ज्योत या कार्यक्रमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांचे विचार समजलेच नाहीत का? तसा सर्वसाधारण प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेमुळे पुढील काळात राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.