जाहिरात

Solapur News: दारूचं प्रचंड व्यसन, एक दिवस भयंकर केलं, सख्ख्या बहिणीने पतीच्या मदतीने भावाला संपवलं

करमाळा तालुक्यातील केम येथील एका शेतात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात करमाळा पोलिसांना अवघ्या 24 तासांत यश आले आहे.

Solapur News: दारूचं प्रचंड व्यसन, एक दिवस भयंकर केलं, सख्ख्या बहिणीने पतीच्या मदतीने भावाला संपवलं
Sister Killed Brother In Solapur karmala (Photo-AI)

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Solapur Crime News Today : करमाळा तालुक्यातील केम येथील एका शेतात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात करमाळा पोलिसांना अवघ्या 24 तासांत यश आले आहे.दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून सख्ख्या बहिणीनेच आपल्या पतीच्या मदतीने भावाचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

12 एप्रिल 2026 रोजी केम येथील दत्तात्रय तुकाराम देवकर यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला असलेल्या मकवानाच्या (मक्याच्या)गंजीच्या आडोशाला मल्हारी पोपट कांबळे (38)यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.मात्र,शवविच्छेदन अहवालात मल्हारी यांचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे समोर आले.त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली.

शितल केंगारेने दिली खुनाची कबुली 

पोलीस निरीक्षक रणजीत माने आणि त्यांच्या पथकाने मृताचे नातेवाईक शितल राजू केंगारे (बहीण) आणि राजेश बापू केंगारे (भावजी) यांची चौकशी केली.चौकशीदरम्यान त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली. यावेळी शितल केंगारेने खुनाची कबुली दिली.

नक्की वाचा >> Washim News: वाशिममध्ये उष्माघाताचा पहिला बळी, गावकरी हळहळले, तरुण हळदीच्या शेतात उतरला अन् काही वेळातच..

मिळालेल्या माहितीनुसार,मृत मल्हारी कांबळे याला दारूचे प्रचंड व्यसन होते.11 एप्रिलच्या रात्री तो दारू पिऊन घरी आला आणि बहिणीशी भांडण करू लागला.या रोजच्या त्रासाला कंटाळून आणि रागाच्या भरात शितलने आपल्या ओढणीने मल्हारीचा गळा आवळला.यातच त्याचा मृत्यू झाला.त्यानंतर शितल आणि तिचा पती राजेश या दोघांनी मिळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मल्हारीचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता.

नक्की वाचा >> Ambarnath News: अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात भयंकर घटना, पोलिसांनाही धक्काबुक्की, Video व्हायरल

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस.यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने,सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर,पोसई जाधव आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत माने करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com