विधानसभेआधी ठाकरे- शिंदे वर्षावर भेटले, चर्चा काय झाली?

ठाकरे यांनीही आपली भूमीका स्पष्ट करताना दोनशे पेक्षा जास्त जागा मनसे लढवणार असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी जावून भेट घेतली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई राज्यात होणार आहे. तर वंचितनं आपली स्वतंत्र चुल मांडली आहे. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनीही मराठा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज ठाकरे यांनीही आपली भूमीका स्पष्ट करताना दोनशे पेक्षा जास्त जागा मनसे लढवणार असल्याचे सांगितले आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी राज यांनी आग्रह धरला आहे. राज ठाकरे ज्या मतदार संघामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहेत त्या ठिकाणी हे प्रश्न महत्वाचे आहे. वरळीच्या बीबीडी चाळीचा प्रश्न राज यांनी हाती घेवून आदित्य ठाकरेंवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.  

ट्रेंडिंग बातमी -  ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

या भेटी वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे सर्व नेते आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज यांचे प्रश्न जाणून घेतले. शिवाय  या बैठकीला राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

ट्रेंडिंग बातमी -  लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार? उच्च न्यायालयात याचिका, मागणी काय?

राज ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही काळापासून जुवळून घेतले आहे. आता विधानसभा निवडणूका होता आहेत. अशा वेळी राज ठाकरे यांचा फॅक्टर मुंबईसाठी महत्वाचा ठरू शकतो. मुंबईत शिंदे पेक्षा ठाकरेंची ताकद निश्चितच जास्त आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना बळ देण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळेच राज यांच्या मागण्यांना त्यांना प्राधान्य दिलेले दिसते. शिवाय राज यांच्या मागण्याही मुंबईतल्या असल्याने शिंदे यांनीही त्याला लगेच प्रतिसाद दिला आहे. 

Advertisement