जाहिरात

MNS News: 'आम्हीच संभ्रमात, राज ठाकरेंचे सर्वांसोबत चांगले संबंध', नांदगावकरांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

शिवसेने सोबत युती झाली पाहिजे की नाही याबाबत कार्यकर्त्यांनी आपली भावना मांडली.

MNS News: 'आम्हीच संभ्रमात, राज ठाकरेंचे सर्वांसोबत चांगले संबंध', नांदगावकरांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
नाशिक:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळालेले नाही. त्यात आणखी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केले आहे. आम्हीच संभ्रमात आहोत. युती बाबत राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतली. त्यांचे सर्वां सोबत चांगले संबंध आहेत हे सांगायला ही ते विसरले नाहीत. त्यामुळे मनसे आगामी काळात कोणाबरोबर असणार की एकला चलो रे ची भूमिका कायम ठेवणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

इगतपूरी इथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर नांदगावकर बोलत होते. बरेच दिवस जवळच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांना भेटता आलं नव्हतं. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. एमएमआर रिजनमधल्या कार्यकर्त्यांसोबत हा संवाद होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न यावेळी राज ठाकरे यांना विचारली. त्या प्रश्नांची  उत्तरे राज यांनी यावेळी दिल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. 

नक्की वाचा - मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का

शिवसेने सोबत युती झाली पाहिजे की नाही याबाबत कार्यकर्त्यांनी आपली भावना मांडली. यावर राज ठाकरे यांनी युती करायची की नाही हा विषय माझ्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय आणि भूमिका घेईन असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही बंधूंची युती व्हावी, ही महाराष्ट्राची भावना आहे. आमची भावना ती महाराष्ट्राची भावना आहे. असं ही यावेळी नांदगावकर म्हणाले. पण त्याच बरोबर त्यांना आणखी एक महत्वाचे विधान केले आहे. 

नक्की वाचा - Nalasopara News: भर रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांना बाप-लेकाने चोपले, फ्री स्टाईल हाणामारीचा video viral

राज ठाकरेंचे फडणवीस यांच्यासोबत सबंध चांगले आहेत. एकनाथ शिंदेशी चांगले जमते. शरद पवारां सोबतही त्यांचे चांगले नाते आहे. त्यामुळे इतर लोक संभ्रमात असतील तर त्याला काय इलाज नाही. कारण आम्हीच संभ्रमात आहोत. उद्या संघटन महत्वाचं आहे. उद्या पक्षाने एकला चलो रे ही भूमिका घेतली तरी त्यात काही वावग नाही. युतीसंदर्भातला जो निर्णय असेल तो निर्णय राज ठाकरे  घेतील असं ही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान प्रकाश महाजन यांची आपण समजूत काढणार असल्याचं ही ते म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com