मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसैनिकांना एक कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार राज्यातल्या बँका आता राज यांच्या रडारवर आहेत. अनेक बँकामध्ये मराठीतून व्यवहार होत नाहीत. मराठी बोललं जात नाही. त्यामुळे प्रत्येक बँकेतील कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावे, असा आग्रह राज ठाकरे यांच्या मनसेने धरला आहे. त्यातून त्यांनी सर्व बँकांना निवेदन देण्याची मोहिम राबवली जात आहे. मात्र लोणावळ्यात मात्र भलतचं घडलं आहे. निवदेन देण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांनी मराठी अपमान करणाऱ्याला चांगलाच प्रसाद देत इंगा दाखवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर मनसैनिक राज्यातील बँकांना निवेदन देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुकाच्यावतीने सर्व बँकांना मराठी भाषेचा वापर करावा यासाठी निवेदन दिले जात आहे. लोणावळा शाखेतील महाराष्ट्र बँकेत मनसैनिक निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी बँकेतील परप्रांतीय मॅनेजरने मराठी बोलणार नाही असे स्पष्ट पणे मनसे कार्यकर्त्यांना सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - Waqf Bill: 'वक्फची जमीन सोडा, चीनने किती जमीन हडप केली सांगा' अखिलेश यादव भडकले
मराठी बोलण्यास नकार दिल्याने यावेळी मनसे कार्यकर्ते चिडले. ते आणखी आक्रमक झाले. बँकेत तणाव निर्माण झाला. मनसे कार्यकर्ते आणि बँक मॅनेजर यांच्यात बाचाबाची सुरू झाली. मात्र तितक्यात एका मराठी कर्मचाऱ्याने यात मध्यस्थी केली. त्याने मनसैनिकांनाच मराठी भाषेविना काही अडत नाही. त्याच्या या बोलण्याने मनसे कार्यकर्त्यांना राग अनावर झाला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या बँकेतील मराठी कर्मचाऱ्यालाच चांगलाच चोप दिला. त्याला चोप देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Beed News: अजित पवार बीडमध्ये, पण धनंजय मुंडे कुठे आहेत ? कारणासोबत ठिकाणही कळालं
मराठी बोलणार नाही अशी भूमीका अनेक ठिकाणी घेतली जाते. त्या विरोधात मनसेने कठोर भूमीका घेतली आहे. मोबाईल फोनची गॅलरी असो की अन्य कोणत्याही अस्थापना असो मराठी बोलता यायला पाहीजे असा आग्रह मनसेने धरला आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना मात्र मनसे स्टाईल चोप देण्यात आला आहे. आता सर्व बँकामध्ये मराठीसाठी मनसेचा आग्रह आहे. त्यामुळे आणखी किती बँकामध्ये अशी स्थिती निर्माण होते हे पाहावे लागणार आहे.