
वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेत भाग घेताना समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. शिवाय या सुधारणा विधेयकाच्या आडून भाजपची नियत आणि निती कशी चुकीची आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. शिवाय काही असे प्रश्न उपस्थित करत भाजपच्या वर्मावर बोट ठेवले. हे विधेयक म्हणजे एक उमीद असल्याचं सत्ताधारी सांगत आहेत. पण कसली उमीद हे मात्र कुणालाच समजले नाही असा टोला त्यांनी या चर्चेवेळी सत्ताधारी भाजपला लगावला. ज्यावेळी भाजपला आपलं अपयश लपवायचं असतं त्यावेळी भाजप असं काही करत आलं आहे असा आरोप ही त्यांनी या निमित्ताने लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या भाजपमध्ये एक स्पर्धा चालली आहे. खराब हिंदू कोण मोठा आहे असा थेट आरोप त्यांनी या चर्चे वेळी केला. जो पक्ष म्हणतो आम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. पण अजून त्यांना त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडता आलेला नाही. त्यामुळे भाजप काय आहे हे समजते. नवे बील म्हणजे नवी उमीद आहे असं सांगितलं जातयं. प्रत्येक बीलच्या वेळी असचं सांगितलं गेलं. एका रात्रीत नोटबंदी केली गेली. पण ती पुर्ण पणे अपयशी ठरली होती. त्या अपयशावर कधी चर्चा होणार असा खडा सवाल ही अखिलेश यांनी उपस्थित केला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न अजून ही तसेच आहे. ही पण तुमचेच अपयश आहे.
गंगा युमान साफ झाली का? देशात किती स्मार्ट सीटी झाल्या? दत्तक घेतलेल्या गावांचं काय झालं? या सर्व गोष्टींच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं गेलं आहे. तुम्ही लोकांना विचारात घेत नाहीत. हा देश सर्वांनी मिळून बनला आहे. या देशाना आतापर्यंत सर्वांना बरोबरीचा हक्क दिला आहे. संविधान तसा हक्क प्रत्येकाला देतो. पण भाजपला ते मान्य नाही. भाजप ज्यावेळी कुठलं ही नवीन बील आणले त्यावेळी ते आपलं कुठलं तरी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असतं.
भाजपला मुस्लिमांची जमीन आपल्या ताब्यात घ्यायची आहे. तसा त्यांचा डाव आहे. पण महाकुंभमध्ये किती हिंदू हरवले, किती मारले गेले त्यावर या माध्यमातून पडदा टाकण्याचा हा प्रयत्न आहे. कुंभमध्ये आस्था सर्वांची आहे. कुंभ पहिल्यांदा झाले नाही. पण भाजपने 144 वर्षानंतर पहिल्यांदा कुंभ होत आहे असं दाखवलं. सरकार म्हणाले 100 करोडची तयारी आहे. पण तसं नव्हतं. लोकांचा जीव तिथे गेला आहे. सरकारने सांगिलं 30 जणांचे जीव गेला. पण ते कोण आहेत हे अजून ही समजले नाही. जे हरवले त्यांचा पत्ता नाही हे सर्व लपवण्यासाठीच हे वक्फ बील आणलं आहे का असा सवाल ही त्यांनी केला.
ट्रेंडिंग बातमी - Beed News: अजित पवार बीडमध्ये, पण धनंजय मुंडे कुठे आहेत ? कारणासोबत ठिकाणही कळालं
ही जमीन या देशाची जमीन आहे हे कुणालीही मान्य आहे. या देशात रेल्वेची जमीन आहे. या देशात संरक्षण विभागाची जमीन आहे. ही जमीन विकली जात नाही का? असा प्रश्नही यावेळी यादव यांनी केला. त्यामुळे वक्फच्या जमीन पेक्षा, चीनने आपली किती जमीन हडप केली आहे. किती गावं त्यांनी भारतीय जमीनीवर वसवली आहेत. हा खरा प्रश्न आहे. पण त्यावर बवाल नको म्हणून हे बिल आणले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. हे बील ज्या मंत्र्यांनी आणलं आहे त्यांच्या राज्यात किती जागा चीनने हडपली आहे हे ही त्यांनी सांगावे असंही ते यावेळी म्हणाले. तुम्ही या बीलच्या माध्यमातून मुस्लीमांचे हक्क हिसकावून घेत आहात. वक्फमध्ये तुम्हाला बाहेरची माणसं घुसवायची आहेत. शिवाय वक्फची प्रकरण उच्च न्यायालयात नेण्यासही यात मुभा आहे. यातून अनेक वर्ष ती प्रकरणं खितपत पडतील अशी व्यवस्था केली गेली आहे. यातून मुस्लीमांमध्येही फूट पाडण्याचा भाजपचा जावा आहे. राजकीय हेतूने प्रेरीत हे बिल आणलं गेलं असल्याचा आरोपही यावेळी अखिलेश यांनी केला.
भाजप हा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. तो असहमतीलाच आपली शक्ती मानतो. देशातील बहुतांश पक्ष हे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात आहेत. अशा वेळी हे बील का आणलं जात आहे. सरकार हट्ट का करत आहे. हा भाजपचा राजकीय हट्ट आहे. जातीयवादी राजकारणाचे हे नवे रूप आहे असा आरोपही यादव यांनी यावेळी केला. भाजपाला यातून तृष्टीकरणाचे राजकारण करायचे आहे. तसा त्यांचा डाव आहे. भाजपच्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. ती कशी सांभळता येतील यासाठी भाजपने हे बील आणले आहे. अशी विधेयकाला समाजवादी पक्ष विरोध करत आहे. मतदान झाल्यास त्या विरोधात मतदान करू असं ही यावेळी अखिलेश यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world