ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांची भाषा मात्र बदलली आहे. त्यांची प्रतिक्रीया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना त्यांनी थेट धमकावले आहे. धमकावलेच नाही तर परत इथं आलात तर मारून पाठवेन. जे करायचे आहे ते करा. पोलीस कमिश्नरकडे तक्रार करायची असेल तर करा. डोक्यात जावू नका अशी थेट धमकी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय पाटील यांच्यावर टीकेची झोड ही उठली आहे. विरोधी पक्षांने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर काही चुकीचे शब्द गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करा असं सांगितल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
संजय दिना पाटील यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून टिकेची झोड उठली आहे. त्यात ठाकरे सेनेनं ऑपरेशन 'तुडवा' सुरू केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर पाटील यांच्या विरोधात पाटील हे आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांनी पूर्वी असंच झालं होतं, त्यावेळी पाच जण ठार झाले होते असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी पत्रकार संजय दिना पाटील यांच्या निवास्थानी गेले होते. पण प्रतिक्रीया देण्या ऐवजी संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर दादागिरी केली. शिवाय अर्वाच्य भाषेत शिविगाळ ही केली.
ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांना कायद्याची भिती नसलेलं वक्तव्य ही केले. जिकडे तक्रार करायची आहे तिकडे तक्रार करा. मी कोणाल भित नाही. कमिश्नरकडे तक्रा करा अशा शब्दात ते बरळत राहीले. इतक्यांनी त्याचं मन भरलं नाही. ते पुढे धमकवत राहीले. तुम्ही अती करताय. मी विसरून जाईन मी खासदार आहे. तुम्ही पत्रकार आहात ते. उगाच तुम्ही माझ्या डोक्यात जावू नका. मी तुम्हाला जेवायला देतो. आता इथं परत आले तर तुम्हाला मारून पाठवेन. हे रेकॉर्ड करा. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. अशा शब्दात ते धमकावत होते. शिवाय यावेळी ते शिव्यांचा आधार ही घेत होतो. जोरजोरात ओडत होते. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे जनताच विचारत आहेत की हे खासदार आहेत की गुंड.
नक्की वाचा - Pune News: माळशेज घाटात शुकशुकाट! ना पर्यटक ना दुकानदार, ऐन सिजनमध्ये काय घडलं?
या पुढे जावून ते म्हणाले की तुम्हाला मी खूप दिवस सहन करतो. मग अजून कशाला गांXX घुसताय. आता या पुढे माझ्याकडे आला तर मारणार तुम्हाला. काही विचाराय तर तुम्ही मार खाणार. तुम्हाला इथं उभं करायचं नाही अशी ही धमकी त्यांनी दिलीय. मी जेवायला देतो तुम्हाला. तरी तुम्ही माझ्या घरात घुसले. घरात रेकॉर्ड केलं. काही लिमिट आहे की नाही अशा शब्दात ते पत्रकारांवरच भडकले. मी चुकीचं वक्तव्य केलं असेल तर पोलीस कमिश्नर माझ्यावर कारवाई करतील. त्यांनी चौकशीला बोलवलं तर मी जाईल. मी चौकशीला तयार आहे. दरम्यान त्यांच्या यावक्तव्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर टीका तर होत आहे शिवाय कारवाईची ही मागणी होत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ही पाटील यांना दिलगिरी व्यक्त करण्याचा सल्ला दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world