- माळशेज घाटात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही अपेक्षित दमदार पाऊस झालेला नाही
- मान्सून उशीराने सुरु झाल्याने माळशेज घाटातील पर्यटकांच्या गर्दीत मोठी घट झाली आहे
- धबधबे कोरडे असल्यामुळे स्थानिक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि पर्यटनावर परिणाम झाला आहे
अविनाश पवार
राज्यात बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला आहे. तरी पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशेज घाटात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होण्याच्या मार्गावर असतानाही घाट परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबे अद्याप प्रवाहित झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. नाही तर काळात माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. यावेळचे चित्र मात्र वेगळे आहे. त्याला उशीरा येणारा मान्सून आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच माळशेज घाटातील असंख्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून पर्यटक इथे येता. ऐवढेच नाही तर देशभरातून वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने पर्यटन हंगामालाही फटका बसताना दिसत आहे. धबधबे कोरडे असल्याने स्थानिकांच्या पर्यटनाशी निगडित व्यवसायांनाही अपेक्षित गती मिळालेली नाही. हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटनावर अवलंबून असलेले अनेक घटक आता दमदार पावसाची वाट पाहत आहेत.
इथं व्यवसाय करणाऱ्यांना पर्यटकांची प्रतिक्षा आहे. त्यांची वाट पाहण्या शिवाय त्यांच्याकडे काम राहीलं नाही. ते म्हणतात पाऊस झाला आहे. पण नियमित नाही. या महिन्यात माळशेज घाटात धबधबे सुरू होतात. गेल्या वर्षी मे महिन्यात धबधबे होते. पण जून झाला तरी पाऊस नाही. त्यामुळे धबधबे नाहीत. धबधबे नाहीत त्यामुळे पर्यटक ही येत नाहीत अशी खंत इथंल्या एका व्यावसायिकाने व्यक्त केली आहे. आमचा व्यवसाय त्यामुळे बसला आहे. आम्ही पावसाची आता वाट पाहत आहोत. तेवढेच आमच्या हातात आहे असं ही त्याने सांगितले.
याचा फटका स्थानिक व्यवसायाला बसला आहे. शिवाय रोजगारावर ही परिणाम झालेला आहे असं ही इथले व्यवसायिक सांगत आहे. पर्यटक नसल्यामुळे कामाला असलेल्या मुलांनाही आम्ही विश्रांती दिल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे मोजके पर्यटक इथं आले आहेत. पण त्याचा हिरमोड झाला आहे. पाऊस नाही. त्यामुळे धबधबे ही नाहीत. भोपाळवरून खास माळशेज घाट राहण्यासाठी एक ग्रुप आला होता. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. तिथून त्यांनी लोणावळ्याला जाण्याचा निर्णय घेतला. इथलं सौंदर्य पाहण्या सारखं आहे. आम्ही थोडी वाट पाहू असं सांगू ते माळशेज घाटातून थेट लोणावळ्याकडे रवाना झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world