Kalyan News: 'घाबरवायचे काम करू नका, कित्येक आले अन् गेले,आजमावयाचे असेल तर...' शिंदे- नाईक वाद पेटला

2029 मध्ये तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उभे राहा असं आव्हान श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर स्मृतीभ्रंशाचा आजार असल्याचा टोला लगावला
  • खासदार शिंदे यांनी गणेश नाईक यांना २०२९ लोकसभा निवडणुकीत थेट आव्हान दिले
  • महाशिवरात्री निमित्ताने श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील विविध शिव मंदिरांचे दर्शन घेतले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा खरपूस समाचार घेतला आहे. नाईकांना आजार झाला आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानामध्ये उपचार होवू शकतो, असे बोलत 2029 मध्ये लोकसभा निवडणुकीत कल्याणला या असे थेट आव्हानच खासदार शिंदे यांनी गणेश नाईक यांना दिले आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष करीत आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमधील शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुरुवात अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरातून झाली. त्यानंतर मानपाडेश्वर पिंपळेश्वर आणि खिडकाळेश्वर  मंदिराचे दर्शन घेतले. या वेळी शिंदे यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली. 

मला वाटतं शिंदे साहेबांबद्दल बोलून प्रसिद्धी मिळवायचे काम नाईक करत आहेत. मी पण ऐकलं आहे की खासदाराला माजी करून टाकेल आणि एकही नगरपालिका निवडून देणार नाही असं ते म्हणालेत. वयाप्रमाणे काही आजार होतात. नक्की त्यांच्यावर परिणाम होत चाललाय. मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांना स्मृतीभ्रंश हा आजार झालाय. माणूस मागे झालेल्या गोष्टी विसरतात. अशा आजारात माणूस थोडा चिडचिड करतो. व्यक्तिमत्त्वामध्ये बदल घडतो. हा आजार कधी कधी वाढत असतो. हा आजार पूर्णपणे तुम्ही बरा करू शकत नाही.पण त्याला कंट्रोल करू शकतात असा टोला शिंदें यांनी गणेश नाईक यांना लगावला.  

नक्की वाचा - Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवा Video, मोठ्या स्फोट अन् एकच धावपळ

आमच्या बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी औषधं मिळू शकतात असा सल्लाही शिंदे यांनी दिला. हे वल्गना करताय माजी करून टाकू, यांच्या घरामध्ये तिन जण माजी झाले आहेत. मुलं आणि वडील देखील माजी झाले आहेत. जरा मागे जाऊन बघितलं ज्यांच्याबद्दल हे बोलताय त्यांनी कशाप्रकारे माजी केलं. आनंद परांजपे हे नवखे उमेदवार होते. शिवसेनेनं त्यांना उभं केलं आणि निवडून आणलं. तेव्हा शिंदे साहेब मंत्री देखील नव्हते. शिंदे साहेबांनी तुमच्या मुलाला पाडण्याचे काम केलं याची आठवण श्रीकांत शिंदे यांनी नाईक यांना करून दिली. तुम्हाला देखील तुमच्या पक्षातील मंदा म्हात्रे या लाडक्या बहिणीने पाडण्याचे काम केलं. तुमच्या दुसऱ्या मुलाला देखील तुम्ही दुसऱ्या पक्षात पाठविले. 

नक्की वाचा - IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी

त्याला देखील लाडक्या बहिणीने माजी करायचे काम केलं. आता निवडणूक झाली. कल्याण लोकसभेत शतप्रतिशत शिवसेनेचे महापौर आणि शिवसेनेची सत्ता आहे. तुम्ही मला या ठिकाणी घाबरायचे काम करू नका. बहुत लोग आये बहुत लोग चले गये. तुम्हाला जर  आजमावयाचे असेल 2029 मध्ये तुम्ही या. स्वागत आहे. 2029 मध्ये तुम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उभे राहा असं आव्हान त्यांनी दिलं. शिवसेनेची ताकत आणि इथल्या जनतेच्या भरोशावर सत्ता स्थापन केली आहे. शिंदे साहेब जेंव्हा शाखाप्रमुख होते त्या वेळी हे मंत्री होते. शिंदे साहेब मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री झाले तरी पण हे तिथेच आहेत असा टोला ही त्यांनी लगावला. शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर तुम्ही मंत्री झाला नसता, या शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांवर टीका केली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी