Nagpur News: 'FIR हिंदीतून आणा नंतर अपघात विमा क्लेम करा' मनसैनिक धडकले पण घडलं भलतच

हा अपघात विमा जनरल इन्शुरन्स कंपनीचा होता. त्या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

बँक खात्याशी संलग्न असलेल्या विमा क्लेमसाठी हिंदीत भाषांतर केलेली एफआयआर मागण्यात आली. त्यानंतर याबाबत मनसेकडे तक्रार करण्यात आली. मनसैनिक संबधित बँकेत धडकले. त्यानंतर संपूर्ण प्रकार काय आहे तो समोर आला. ही घटना नागपूरात घडली. मनसैनिकांनी हिंदी एफआयआर मागितल्या प्रकरणी नागपूर येथील युनियन बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेसमोर आंदोलन केले. यावेळी मनसैनिक आक्रमक झाले होते. 

योगेश बोरचे या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. या तरुणाच्या अपघात विमा क्लेमसाठी त्याचे कुटुंबीय युनिय बँकेत गेले होते. पण तिथे त्यांना हिंदीतून  एफआयआर मागण्यात आली असा आरोप बोपचे कुटुंबीयांच्या शेजाऱ्यांकडून करण्यात आला होता. हा विमा योगेश बोपचे यांच्या युनियन बँकेतील खात्याशी संलग्न होता. ही माहिती मनसैनिकां पर्यंत पोहोचली. त्यांनी याची तातडीने दखल घेतल थेट बँकेचे शाखा गाठली. तिथेच मनसैनिकांनी आंदोलन ही केलं.

नक्की वाचा - Pandharpur News: दिरासोबत प्रेमसंबंध, मृत्यूचा बनाव अन् हत्या; सिनेमालाही लाजवेल अशा घटनेने सगळेच हादरले

हा अपघात विमा जनरल इन्शुरन्स कंपनीचा होता. त्या कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात आहे. तिथल्या अधिकाऱ्यांना मराठी समजत नसल्याने, क्लेम फॉर्मसोबत एफआयआरचे हिंदी भाषांतर पाठवावे लागते, अशी माहिती युनियन बँकेकडून देण्यात आली आहे. योगेश बोपचे यांच्या प्रकरणातही हेच कारण देत हिंदीत एफआयआर मागवण्यात आली होती, असा स्पष्टीकरणात्मक दावा बँकेने केला आहे.

नक्की वाचा - Sangli News: सांगलीचा रँचो! 10 वीच्या विद्यार्थ्याचा देसी जुगाड, दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना चाप बसणार

मनसेच्या आंदोलनानंतर युनियन बँकेने मनसे आणि बोपचे कुटुंबीयांची माफी मागितली. त्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले. बँकेने स्पष्ट केले की, व्यवहारासाठी मराठी ही राजभाषा म्हणून वापरली जाते आणि ऑनलाईन फसवणूक, एटीएम चोरी किंवा इतर प्रकरणांमध्ये मराठी एफआयआर स्वीकारली जाते. मात्र विमा कंपनी कोलकात्यात असल्याने हिंदी किंवा इंग्रजी भाषांतर आवश्यक ठरते. यासोबत मूळ एफआयआरही जोडलेली असते, असे बँकेचे म्हणणे आहे. या प्रकरणात मराठी भाषेचा अपमान झाल्याचा कोणताही मुद्दा नसताना, काही लोकांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Advertisement